Join us  

शेवटची संधी...सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोने; आज बंद होणार योजना, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:37 AM

गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न देणारी सॉवेरन गोल्ड बॉन्ड स्कीमचे उद्दिष्ट फिजिकल गोल्डची मागणी कमी करणे आहे.

नवी दिल्ली – जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल आणि सुरक्षेसोबतच जबरदस्त रिटर्न हवा असेल तर तुमच्याकडे आज अखेरची संधी आहे. सॉवेरन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२३-२४(Sovereign Gold Bond Scheme) ची दुसरी सीरीज आज बंद होणार आहे जी ११ सप्टेंबरला खुली झाली होती. ज्याठिकाणी सरकार बाजार भावापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची ऑफर देत होती. जर तुम्ही या योजनेचा फायदा घेतला नसेल तर आजच तुम्ही गुंतवणूक करू शकता.

यादरात मिळतंय सोनं

गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न देणारी सॉवेरन गोल्ड बॉन्ड स्कीमचे उद्दिष्ट फिजिकल गोल्डची मागणी कमी करणे आहे. त्यामुळे सरकार कमी दरात सोने विक्री करते. यावेळी सोन्याचे दर ५९२३ रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. सरकारने सोन्याची फिजिकल मागणी कमी करण्यासाठी सर्वात पहिले सरकारी गोल्ड बॉन्ड योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये आणली होती. सरकारच्या या योजनेत बाजार भावापेक्षा कमी दरात सोन्यात गुंतवणूक करू शकता. त्यात गुंतवणुकीवर सरकारकडून सुरक्षेची गॅरेंटी मिळते.

डिजिटल गोल्ड बॉन्ड विकतं सरकार

या योजनेत सरकार सोने विक्री करते, हे एकप्रकारे पेपर गोल्ड अथवा डिजिटल गोल्ड असते. ज्यात तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाते की कोणत्या दरात तुम्ही किती सोने खरेदी केले आहे. हे डिजिटल गोल्ड खरेदी केल्यावर त्यावर रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते. उदा. एसजीबी स्कीमतंर्गत गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली जाते. जे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी करतात. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये वार्षिक २.५ टक्के व्याज मिळते आणि हे सुरक्षित रिटर्न असते. त्याशिवाय या योजनेत सोने खरेदी केल्यावर सरकारच्या निश्चित केलेल्या दरावरही सूट मिळते.

ऑनलाईन खरेदीवर अतिरिक्त सूट

SGB Scheme अंतर्गत ऑनलाईन खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये सूट दिली जाते. अशावेळी जर तुम्ही ऑनलाईन सोने खरेदी केले तर तुम्हाला १ ग्रॅमसाठी ५९२३ रुपयांऐवजी केवळ ५८७३ रुपये द्यावे लागतील. या योजनेत एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती सर्वाधिक ५०० ग्रॅम गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकते. जर गुंतवणूकदारांना कमीत कमी १ ग्रॅम सोन्यात पैसे गुंतवावे लागतात.

आतापर्यंत किती मिळाला रिटर्न?

गुंतवणूकदार डिजिटल गोल्ड कॅशनेही खरेदी करू शकतात. जितक्या रक्कमेचे सोने खरेदी केले जाते तितकेच मूल्य सॉवेरन गोल्ड बॉन्ड जारी केला जातो. याचं मॅच्युरिटी कालावधी ८ वर्षांचा असतो. परंतु ५ वर्षानंतर तुम्हाला गुंतवणूक केलेले पैसे काढण्याची मुभा आहे. एक आणखी वैशिष्टे म्हणजे सॉवेरन गोल्ड बॉन्डमध्ये २४ कॅरेट म्हणजे ९९.९ टक्के शुद्ध सोने मिळते. गोल्ड बॉन्डच्या या योजनेच्या हफ्त्याची सेटलमेंट डेट २० सप्टेंबर २०२३ निश्चित केली आहे.

कसं आणि कुठून खरेदी कराल गोल्ड बॉन्ड?

भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) भारत सरकारकडून हे गोल्ड बॉन्ड जारी केले जाते. हे बॉन्ड बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय टपाल कार्यालय, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजसारख्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या माध्यमातून विकले जाते.

टॅग्स :सोनंगुंतवणूक