Join us

वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी बजेटमध्ये विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:45 PM

कृष्णा, १ फेब्रुवारीला २0१८-१९ चे केंद्रीय बजेट जाहीर झाले. या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आले?

-सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ फेब्रुवारीला २0१८-१९ चे केंद्रीय बजेट जाहीर झाले. या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आले?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, या वर्षी अप्रत्यक्ष करापेक्षा प्रत्यक्ष करावर जास्त भर देण्यात आला आहे. सरकारने प्राप्तिकर दरात आणि करातून मिळणा-या वजावटीमध्ये थोडेसे बदल केले आहेत. या अर्थसंकल्पात वरिष्ठ नागरिकांच्या वजावटीवर सरकारने विशेष लक्ष दिले आहे.अर्जुन : कृष्णा, वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या वजावटीत काही बदल झाले का?कृष्ण : होय, वरिष्ठ नागरिकांना आधी कलम ८0 (डी) अंतर्गत आरोग्य विम्याची ३0 हजार रुपयांपर्यंत वजावट मिळत होती. या अर्थसंकल्पात ती मर्यादा ५0 हजार रुपयांपर्यंत वाठवली आहे. म्हणजे वरिष्ठ नागरिकांना आता एकूण उत्पन्नातून ५0 हजार रुपयांपर्यंत आरोग्य विम्याची वजावट मिळेल. सामान्य नागरिकांसाठी ही मर्यादा २५ हजार रुपये आहे. करदात्यांचे पालक हे करदात्यांवर अवलंबून असतील आणि करदात्याने त्यांचा आरोग्य विम्याचा हप्ता भरला असेल, तर त्याला एकूण उत्पन्नातून ही वजावट मिळेल.अर्जुन : कृष्णा, वरिष्ठ नागरिकांना निर्दिष्टित आजारांच्या उपचारांच्या खर्चाची काही वजावट मिळते का?कृष्ण : अर्जुना, होय, कलम ८0 (डीडीबी) अंतर्गत वरिष्ठ नागरिकांना निर्दिष्टित आजारांच्या उपचारांसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची काही प्रमाणात एकूण उत्पन्नातून वजावट मिळते. आधी याची मर्यादा वरिष्ठांसाठी ६0 हजार आणि अतिवरिष्ठ नागरिकांसाठी ८0 हजार रुपये होती. आता ती सरसकट १ लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजे वरिष्ठ वा अतिवरिष्ठ नागरिक यांना एक लाखांपर्यंत वजावट मिळेल. करदात्यांचे पालक हेकरदात्यांवर अवलंबून असतील आणि करदात्याने त्यांच्या निर्दिष्टित आजारांचा खर्च उचलला असेल, तर करदात्याच्या एकूण उत्पन्नातून ही वजावट मिळेल.अर्जुन : कृष्णा, बचत खात्यावर मिळणाºया व्याजावर काही वजावट मिळते का?कृष्ण : अर्जुना, कलम ८0 (टीटीए) अंतर्गत बचत खात्यावरील व्याजाची १0 हजार रुपयांपर्यंत वजावट मिळते, परंतु अर्थसंकल्पातील वरिष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५0 हजार रुपये करण्यात आली आहे. आता वरिष्ठ नागरिकांना ८0 (टीटीए) अंतर्गत बँक, पोस्टबचतीबरोबरच फिक्सडिपॉझिटवरील एकूण व्याजाच्या वजावटीची मर्यादा ५0 हजार रुपये आहे. त्याचबरोबर, वरिष्ठ नागरिकांसाठी ५0 हजार रुपये व्याजावर टीडीएसही केला जाणार नाही.अर्जुन : कृष्णा, वरिष्ठ व अतिवरिष्ठ नागरिक म्हणजे कोण?कृष्ण : ज्यांचे वय ६0 वर्षे वा त्याहून अधिक आहे, ते वरिष्ठ नागरिक आणि ज्यांचे वय ८0 वा अधिक आहे, ते अतिवरिष्ठ नागरिक.>अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर आणि वरिष्ठ नागरिकांवर अधिक भर दिला आहे.करदात्याने नवा अर्थसंकल्प समोर ठेवूनच या वर्षी प्राप्तिकर भरावा, नाही तर आॅनलाइन असेसमेंटच्या जाळ्यात अडकला जाईल.

टॅग्स :अर्थसंकल्प २०१८