नवी दिल्ली : मुलाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यांपर्यंत त्याच्या पित्याला पितृत्व रजा मिळावी, अशी तरतूद असलेले एक खासगी विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
‘पितृत्व लाभ विधेयक-२0१७’ या नावाचे हे विधेयक बाळाची आई आणि पिता यांना समान रजा लाभ मिळवून देण्याचा आग्रह धरते. या विधेयकाला पाठिंबा देणारे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी सांगितले की, बाळाची देखभाल ही माता आणि पिता या दोघांचीही जबाबदारी आहे. बाळाच्या दोन्ही पालकांनी त्याच्या भल्यासाठी वेळ द्यायलाच हवा. या विधेयकात खासगी आणि असंघटित क्षेत्रातील विशेषत: अंगमेहनतीचे काम करणाºयांना पितृत्व रजा देण्याची तरतूद आहे.
विधेयक संमत झाल्यास ३२ कोटी लोकांना लाभ मिळेल. केंद्र सरकारच्या कर्मचाºयांना सध्या १५ दिवसांची पितृत्व रजा मिळते. अनेक कंपन्याही कर्मचा-यांना पितृत्व रजेचा लाभ देतात; पण कंपन्यांवर पितृत्व रजा देण्याचे बंधन नाही. लाभ देणाºया कंपन्या स्वपुढाकाराने पितृत्व रजा देतात. ‘पितृत्व रजेचा केवळ कालावधी वाढवून भागणार नाही, सर्व क्षेत्रांतील सर्व कामगारांना ती मिळायला हवी,’ असे या विधेयकात म्हटले आहे.
तीन महिन्यांच्या पितृत्व रजेसाठी खासगी विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात होणार सादर
मुलाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यांपर्यंत त्याच्या पित्याला पितृत्व रजा मिळावी, अशी तरतूद असलेले एक खासगी विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:28 AM2017-09-19T01:28:33+5:302017-09-19T01:28:48+5:30