Join us

IRCTC-SBI-RUPAY चं स्पेशल कार्ड लॉन्च, प्रवाशांना तिकिटासह इतर खरेदीवर मिळणार बंपर लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 2:32 PM

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याहस्ते आज IRCTC-SBI-RUPAY या एका विशेष कार्डंच अनावरणक करण्यात आले असून, या कार्डचा वापर करणाऱ्या  रेल्वेप्रवाशांना विशेष सुविधा मिळणार आहेत.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संर्सर्गामुळे देशातील रेल्वेसेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू नसली तरी रे्ल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने खूशखबर दिली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याहस्ते आज IRCTC-SBI-RUPAY या एका विशेष कार्डंच अनावरणक करण्यात आले असून, या कार्डचा वापर करणाऱ्या  रेल्वेप्रवाशांना विशेष सुविधा मिळणार आहेत.

अनेक सुविधांनी युक्त असलेल्या या कार्डच्या माध्यमातून एसी-१, एसी-२, एसी-३, एसी आणि सीसी क्लासच्या रेल्वे तिकिटांचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना १० टक्के व्हॅल्यू बॅक रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा अधिक लाभ होणार आहे.

या कार्डमधील एक रिवॉर्ड पॉईंटचे मूल्य हे एक रुपयाच्या बरोबर असेल. या रिवॉर्डस् पॉईंटचा वापर कार्ड होल्डर आयआरसीटीसीवरून मोफत रेल्वे तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी करू शकतील, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

  या कार्डमध्ये हे आहेत मुख्य फिचर्स

- जर तुम्ही ३१ मार्च २०२१ पर्यत या कार्डसाठी अप्लाय केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जॉयनिंग शुल्क द्यावं लागणार नाही.

- या कार्डवर तुम्हाला ३५० अॅक्टिवेट पॉईंट्स मिळतील

-याशिवाय आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करताना १ टक्का ट्रांझॅक्शन शुल्क माफ असेल

- त्याबरोबरच कुठल्याही पेट्रोलपंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरल्यास तुम्हाला एक टक्क्यापर्यंत इंधन सरचार्ज माफ असेल

- बिग बास्केट, OXXY, Foodfrotravel.in, Ajio सारख्या ई कॉमर्स वेबसाइटवर डिस्काऊंट मिळेल.

- हे कार्ड निअर फिल्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने लेस आहे. त्यामुळे ग्राहकांना सुविधाजनक, सुरक्षित आणि त्वरित व्यवहारांसाठी सिक्योर रीडरवर केवळ हे कार्ड टॅप करावे लागेल.

- त्याशिवाय रुपे मे़डलाइफवरून औषधे मागवल्यास २० टक्के सूट मिळेल. फिटरनिटीवर २५ टक्के सूट मिळेल. तसेच एक रुपयामध्ये हंगामा म्युझिकचे सब्सक्रिप्शन आणि अन्य पोर्टलवरील खरेदीवर विशेष सवलत मिळेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

टॅग्स :भारतीय रेल्वेएसबीआयपीयुष गोयल