नवी दिल्ली : प्रख्यात योगगुरू व सेल्फ-रियलायझेशन फेलोशिप या संस्थेचे संस्थापक परमहंस योगानंद यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने १२५ रुपये किमतीचे विशेष नाणे जारी केले. दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत याची घोषणा करण्यात आली.
नाण्याच्या एका बाजूला अशोकचक्र व दुसऱ्या बाजूस परमहंस योगानंद यांचे छायाचित्र आहे. त्यांची जयंती व पुण्यतिथीच्या वर्षांचा उल्लेख आहे. नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असून, त्यात ५0 टक्के चांदी आहे.पाकिस्तानात गुरूनानक यांचे नाणेइस्लामाबाद : शीख पंथाचे संस्थापक गुरूनानक देव यांच्या ५५0व्या जयंतीनिमित्त पाकिस्तान सरकारने ५0 रुपये मूल्याचे विशेष नाणे जारी केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या विशेष नाण्याचे छायाचित्र दिले आहे. कर्तारपूर कॉरिडॉर ९ नोव्हेंबर रोजी सुरू होत असून, त्यामुळे भारतातील शिखांना पाकिस्तानातील श्रद्धास्थानी जाता येणार आहे. तिथे ते गुरूनानक यांच्यावरील विशेष नाणे निश्चितच विकत घेतील, असे पाकिस्तानला वाटते.