नवी दिल्ली : देशात खासगी रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या प्रस्तावाचा आराखडा नीति आयोगाने तयार केला असून, सरकारी रेल्वेच्या तुलनेत काही खास सवलती या गाड्यांना दिल्या जाणार आहेत. खासगी गाड्यांना १५ मिनिटांचा अग्र प्रारंभ (हेड स्टार्ट) मिळेल, म्हणजेच संबंधित मार्गावरील इतर रेल्वेच्या १५ मिनिटे आधी या गाड्या सुटतील. त्यांची परवानाप्राप्त कमाल गती ताशी १६0 कि.मी. असेल. त्यांना स्वत:चे गार्ड्स, कर्मचारी असतील, असे प्रस्तावात म्हटले आहे.
या धोरणाशी संबंधित काही दस्तावेज आयोगाने वेबसाइटवर टाकले आहेत. देशातील १00 रेल्वे मार्गांवर १५0 खासगी रेल्वे चालविण्याची योजना आहे. त्यासाठी २२ हजार ५00 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे, असे प्रस्तावावरून दिसते. आयोगाने सर्व हितधारकांशी चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव खुला केला आहे. रेल्वेकडून चालविण्यात येणाऱ्या सर्वांत वेगवान रेल्वेंशी स्पर्धा करता येईल, एवढी गती खासगी रेल्वे चालक ठेवू शकतील. गतीमध्ये १0 टक्के कमी-जास्त झाल्यास मान्य असेल. रेल्वेच्या देखभालीची जबाबदारी खासगी संस्थेचीच असेल. देखभालीचे मानक ‘रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन’ या संस्थेकडून आखून दिले जाईल.
>भाडे, दर्जा, थांबे यांवर बंधन नाही
या प्रस्तावानुसार, ज्या १00 मार्गांवर खासगी रेल्वे चालविल्या जाणार आहेत, त्यांची १0 ते १२ क्लस्टर्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. खासगी रेल्वेच्या आॅपरेटरांना बाजारभावानुसार प्रवास भाडे आकारण्याची मुभा असेल. आपल्या रेल्वेच्या श्रेणी व थांबे ठरविण्याची मुभाही त्यांना असेल.
खासगी रेल्वेंना आधी सुटण्याची खास सवलत, नीति आयोगाचा प्रस्ताव
रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या प्रस्तावाचा आराखडा नीति आयोगाने तयार केला असून, सरकारी रेल्वेच्या तुलनेत काही खास सवलती या गाड्यांना दिल्या जाणार आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:29 AM2020-01-09T03:29:02+5:302020-01-09T03:29:15+5:30