बार्सिलोना : स्पेक्ट्रमच्या वाढीव दरावर वोडाफोन या ब्रिटिश कंपनीने तीव्र चिंता व्यक्त केली असून त्यामुळे भारतातील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.
वोडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी वित्तोरियो कोलाओ यांनी सोमवारी येथे सांगितले की, भारतात शुल्क दर फार कमी आहेत. या पार्श्वभूमीवर स्पेक्ट्रमचे मूल्य निर्धारण आणि भारतीय बाजारातील अंतर्गत भांडवलाचा तपशील जाहीर केला पाहिजे. जर स्पेक्ट्रमचे दर जास्त वाढविण्यात आले, तर गुंतवणूक होणार नाही. स्पेक्ट्रमवरील खर्च आणि आर्थिक स्थिती सुसंगत पाहिजे.