नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील उर्वरित काळात लिलाव नसतानासुद्धा दूरसंचार खात्याला स्पेक्ट्रममधून ४९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम ६ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात स्पेक्ट्रम विक्री व इतर परवाना शुल्कासहित उत्पन्नाचे लक्ष्य ४२ हजार ८६५ कोटी रुपये निर्धारित केले होते.
याशिवाय रिलायन्सकडून १६ विभागांतील स्पेक्ट्रम शुल्कातून ५ हजार ३८४ कोटी, तर वोडाफोनकडून विविध विलीनीकरणासाठी २,४५० कोटी रुपये उत्पन्न दूरसंचार खात्याला मिळाले, ही माहिती देऊन गर्ग म्हणाले की, चालू आर्थिक वर्षातील उर्वरित महिन्यात रिलायन्सकडून चार विभागांतून ६,००० कोटी रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे.
रिलायन्स कम्युनिकेशनने २० विभागांमध्ये ८०० मेगाहर्टज् स्पेक्ट्रम खुले करण्यासाठी अर्ज केला असून, गर्ग यांच्या म्हणण्यानुसार सरकार मे-जूनमध्ये पुढच्या टप्प्यातील स्पेक्ट्रमचा लिलाव करू शकते. याबाबतचा ट्रायच्या आरक्षित मूल्यांबाबत शिफारशी या महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारकडे येतील, अशी अपेक्षा
आहे.
ते म्हणाले की, ट्रायची शिफारस आल्यानंतरही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास चार-पाच महिने लागतात. कारण दूरसंचार खात्याला अनेक स्पष्टीकरणे मागवावी लागतात. मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी दूरसंचार आयोगाला आरक्षित मूल्यांवर अंतिम निर्णय घ्यावा लागतो.
स्पेक्ट्रमचे मिळणार ४९ हजार कोटी !
चालू आर्थिक वर्षातील उर्वरित काळात लिलाव नसतानासुद्धा दूरसंचार खात्याला स्पेक्ट्रममधून ४९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
By admin | Published: January 25, 2016 02:09 AM2016-01-25T02:09:13+5:302016-01-25T02:09:13+5:30