Lokmat Money > बिझनेस न्यूज > आॅनलाईन आयटी रिफंडला गती देणार

आॅनलाईन आयटी रिफंडला गती देणार

आॅनलाईन रिटर्न भरणाऱ्या करदात्यांचे रिफंड त्वरित मिळावे यासाठी आयकर विभाग या प्रक्रियेला अधिक गती देणार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 02:07 AM2016-01-25T02:07:57+5:302016-01-25T02:07:57+5:30

आॅनलाईन रिटर्न भरणाऱ्या करदात्यांचे रिफंड त्वरित मिळावे यासाठी आयकर विभाग या प्रक्रियेला अधिक गती देणार आहे

Speed ​​up the online IT refund | आॅनलाईन आयटी रिफंडला गती देणार

आॅनलाईन आयटी रिफंडला गती देणार

नवी दिल्ली : आॅनलाईन रिटर्न भरणाऱ्या करदात्यांचे रिफंड त्वरित मिळावे यासाठी आयकर विभाग या प्रक्रियेला अधिक गती देणार आहे. बंगळुरू येथील सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरच्या (सीपीसी) वतीने या कामी विविध प्रकारच्या स्मार्ट प्रक्रियांचा अवलंब सुरू केला आहे.
सीपीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ७३ टक्के ई-फायलिंग प्रकरणात रिफंड ३0 दिवसांच्या आत देण्याची खबरदारी केंद्राने घेतली आहे. रिफंड देण्यात आलेल्यांचा आकडा वाढण्यासाठी सीपीसीच्या वतीने नव्या आणि अत्याधुनिक प्रक्रियेचा आता अवलंब करण्यात येत आहे.
आयकर विवरण आणि त्यातील तपशील नीट भरला गेला असेल, तर रिफंड महिन्याच्या आत देता येऊ शकतो, याबाबत विभागाला पूर्ण खात्री आहे. अनेक प्रकरणांत सीपीसीने अवघ्या आठवडाभरात रिफंड दिलेले आहे. हे सर्वच प्रकरणांत शक्य व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आयकर विभागाने बंगळुरू येथे सुरू केलेल्या सीपीसीला दर्जेदार कामाबद्दल अलीकडेच आयएसओ ९00१ : २00८ प्रमाणपत्र मिळाले आहे. तीन श्रेष्ठ पुरस्कार मिळालेली ही देशातील एकमेव संस्था
आहे.
बीएसआयचे कार्यकारी संचालक वेंकटराम अरबोलू यांनी सांगितले की, आयकर विभागाच्या या केंद्राला व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील दर्जा व्यवस्थापन, खाजगीपण व सुरक्षा आणि अभिलेखांचे व्यवस्थापन अशा तीन श्रेणींत पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: Speed ​​up the online IT refund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.