Join us

स्पाईस जेटच्या २३ बोइंग विमानांची होणार तपासणी, विमानांच्या सांध्यावर अमेरिकेत आढळले तडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:09 AM

स्पाईस जेटच्या २३ बोइंग-७३७ विमानांची पंख व शरीर चौकटीच्या सांध्यावर तडे शोधण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : स्पाईस जेटच्या २३ बोइंग-७३७ विमानांची पंख व शरीर चौकटीच्या सांध्यावर तडे शोधण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. बी७३७ च्या नव्या पिढीतील (एनजी) काही विमानांच्या सांध्यावर तडे गेल्याचे अमेरिकेत आढळून आले होते. त्यानंतर अमेरिकी केंद्रीय हवाई वाहतूक प्रशासनाने (एफएए) या जातीच्या सर्व विमानांची तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार स्पाईस जेटच्या ताफ्यातील १९ प्रवासी व ४ मालवाहू विमानांची तपासणी केली जाणार आहे.भारतात स्पाईस जेट, एअर इंडिया एक्स्प्रेस व विस्तारा या कंपन्या बी७३७ विमाने वापरतात. भारतीय कंपन्यांवर एफएएच्या निर्देशांचा काय परिणाम होईल, यावर नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ३६ हजार उड्डाणे पूर्ण करणाºया तीन बी७३७-८०० विमानांच्या सांध्यावर तडे आढळल्याचे बोइंग कंपनीने कळविले. याच वयाच्या आणखी दोन विमानांची तपासणी करण्यात आली पण त्यात काहीही सापडले नाही. त्यानंतर १९ बी७३७-७०० व दोन बी७३७-८०० विमानांचीही तपासणी केली. यातही काहीही आढळून आले नाही. तरीही सर्वच बी७३७ एनजी विमानांची तपासणी बोइंग करणार आहे.

टॅग्स :स्पाइस जेटविमान