Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'शिवशाही'च्या दरात विमानप्रवासाची संधी, 899 रुपयांत स्पाईसजेटचे उड्डाण

'शिवशाही'च्या दरात विमानप्रवासाची संधी, 899 रुपयांत स्पाईसजेटचे उड्डाण

शिवशाही बसने प्रवास केल्यास प्रवाशांना जवळपास 1.60 पैसे प्रतिकिमी रुपये भाडे आकारले जाते. तर, स्पाईसजेटच्या या ऑफरनुसार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:05 PM2019-02-06T16:05:01+5:302019-02-06T16:06:06+5:30

शिवशाही बसने प्रवास केल्यास प्रवाशांना जवळपास 1.60 पैसे प्रतिकिमी रुपये भाडे आकारले जाते. तर, स्पाईसजेटच्या या ऑफरनुसार

SpiceJet flight at Shivshahi rate, Rs. 899 Spicejet flight | 'शिवशाही'च्या दरात विमानप्रवासाची संधी, 899 रुपयांत स्पाईसजेटचे उड्डाण

'शिवशाही'च्या दरात विमानप्रवासाची संधी, 899 रुपयांत स्पाईसजेटचे उड्डाण

नवी दिल्ली - स्पाईसजेट कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्तात विमानप्रवास योजना सुरू केली आहे. या योजनुसार देशांतर्गत प्रवास 1.75 रुपये प्रतिकिमी तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास 2.5 प्रतिकिमी ठेवण्यात आला आहे. पण, ठराविक कालावधीसाठीच ही ऑफर देण्यात आली आहे. देशांतर्गत मार्गांवर सुरुवातीचे भाडे किमान 899 रुपये ठेवण्यात आले आहे. तर, आंतरराष्ट्रीय महामार्गावरील प्रवास 3699 रुपयांपासून सुरू होत आहे. त्यामुळे शिवशाही बसच्या दरात विमानप्रवासाचा लाभ मिळणार आहे. 

शिवशाही बसने प्रवास केल्यास प्रवाशांना जवळपास 1.60 पैसे प्रतिकिमी रुपये भाडे आकारले जाते. तर, स्पाईसजेटच्या या ऑफरनुसार 1.75 रुपये प्रतिकिमी भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे शिवशाहीच्या दरात विमानप्रवास करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे, असेच म्हणता येईल. स्पाईसजेटच्या या तिकीट बुकींगवर 10 टक्के अतिरिक्त कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. एसबीआय क्रेडिटकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, एसबीआयची ऑफर आणि अतिरिक्त लाभ घेण्यासाठी स्पाईसजेटच्या www.spicejet.com या वेबसाईटवरुनच तिकीटाचे बुकींग करावे लागणार आहे. तर यात्री प्रोमो कोड ADDON25 चा वापर केल्यास प्रीफर्ड सीट, जेवण आणि स्पाईट मॅक्सवर 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच स्पाईसजेट मोबाईल अॅपच्या सहाय्याने बुकिंग केल्यास तिकीट दरांमध्ये 5 टक्के सवलत मिळेल. प्रवाशांना 5 टक्के ऑफरचा लाभ घेण्यासाठी ADDON30 हा प्रोमोकोड वापरावा लागणार आहे. 

मंगळवारपासून म्हणजेच 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत प्रवाशांना तिकीटाचे बुकिंग करता येईल. तर, 25 सप्टेंबर 2019 पर्यंत या बुकींगद्वारे प्रवास करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेनुसार या ऑफरचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार, दिल्ली ते कोईम्बतूर तिकीटदर 2899 रुपये आहे. तर मुंबई ते कोच्ची तिकीटदर 1849 रुपये आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी, कोलकाता ते ढाका आणि मदुराई ते दुबई प्रवास केल्यास 3699 रुपये भाडे आकारण्यात येईल. 
 

Web Title: SpiceJet flight at Shivshahi rate, Rs. 899 Spicejet flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.