Join us

SpiceJet ची टॅक्सी सर्व्हिस लाँच, आता एअरपोर्टवर पोहोचणे होईल सोपे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 3:11 PM

SpiceJet Taxi Service: स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, 28 प्रमुख एअरपोर्टवर टॅक्सी सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : बजेट एअरलाइन स्पाइसजेटने प्रवाशांच्या सोयीसाठी स्पाइसजेट टॅक्सी सर्व्हिस (SpiceJet Taxi Service) सुरू केली आहे. या टॅक्सीसाठी कॅन्सलेशन फी झिरो ठेवण्यात आली आहे, याशिवाय वेटिंग टाइम सुद्धा झिरो असणार आहे. ही सुविधा देशातील सर्व प्रमुख एअरपोर्ट आणि दुबईमध्ये उपलब्ध असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टॅक्सी पूर्णपणे सॅनिटाइज ठेवली जाईल. कॅब सेवा एंड-टू-एंड उपलब्ध असेल. एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी घरातून पिक-अप आणि एअरपोर्टवरून घरी पोहोचण्यासाठी अशा दोन्ही सुविधा उपलब्ध असतील.

स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, 28 प्रमुख एअरपोर्टवर टॅक्सी सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. यात दुबई एअरपोर्टचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या ही सुविधा दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, वाराणसी, अमृतसर, जयपूर, अहमदाबाद, कोची, पुणे, तिरुपती, डेहराडून, पोर्ट ब्लेअर आणि दुबई येथे सुरू करण्यात आली आहे. स्पाईसजेट टॅक्सी सर्व्हिसचा लाभ घेतल्यानंतर प्रवाशांना झटपट कॅशबॅकचाही लाभ मिळेल.

स्पाइसजेट आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच सक्रिय राहिली आहे. प्रवासी आधीच इन-फ्लाइट कॅब बुकिंगचा लाभ घेत आहेत. याअंतर्गत स्पाइसस्क्रीनच्या मदतीने प्रवासी हवाई सफर करतानाच स्वतःसाठी टॅक्सी किंवा कॅब बुक करू शकतात. स्पाइसजेटच्या टॅक्सी सर्व्हिसच्या मदतीने प्रवाशांच्या सोयी आणखी वाढणार आहेत. स्पाइसजेटचे चीफ बिझनेस ऑफिसर डेबोजो महर्षी यांनी सांगितले की, "या एंड-टू-एंड सर्व्हिसमुळे आमच्या एअरलाइनद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होईल. प्रवाशांना घरातून एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी किंवा एअरपोर्टवरून घरी पोहोचण्यासाठी कॅब बुक करताना कोणतीही अडचण येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे."

झिरो कॅन्सलेशन फी स्पाइसजेट टॅक्सी सर्व्हिसअंतर्गत कॅन्सलेशन फी झिरो ठेवण्यात आले आहे. याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. एअरपोर्टसाठी ड्रॉप आणि पिकअप सर्व्हिस अतिशय आव्हानात्मक होत आहे. असे अनेक वेळा घडते की, प्रवाशांना वारंवार कॅब रद्द करण्याचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतात. झिरो वेटिंग टाईमसह एअरलाइनकडून पिक आणि ड्रॉप सुविधा मिळाल्यामुळे प्रवाशांचा अनुभव चांगला होईल आणि ते तणावमुक्त प्रवास करू शकतील.

SMS द्वारे मिळतील स्पाइसजेट टॅक्सी सर्व्हिसचे डिटेल्सजेव्हा एखादा प्रवासी स्पाइसजेट विमानाचे तिकीट बुक करतो, तेव्हा त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक एसएमएस पाठवला जाईल, त्यामध्ये एक लिंक असेल. ही लिंक स्पाइसजेट टॅक्सी सर्व्हिससाठी असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर प्रवाशाला आपले डिटेल्स अपडेट करावे लागतील. यादरम्यान, पिकअपचे ठिकाण आणि पिकअपची वेळ यासारखी माहिती मागवली जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निश्चित वेळेवर तुम्हाला एक सॅनिटाइज्ड कॅब उपलब्ध होईल. घरातून पिकअप करणे आणि एअरपोर्टवरून घरी ड्राप करणे, अशा दोन्ही बाबतीत याचा लाभ घेता येईल.

टॅग्स :स्पाइस जेटविमानतळटॅक्सीव्यवसाय