Lokmat Money > बिझनेस न्यूज > बॅगेज् वरील अधिक शुल्काचे स्पाइसजेटने केले जोरदार समर्थन

बॅगेज् वरील अधिक शुल्काचे स्पाइसजेटने केले जोरदार समर्थन

प्रवाशांकडील अतिरिक्त सामानावरील (एक्सेस बॅगेज) वाढीव शुल्काचे स्पाइसजेटने जोरदार समर्थन केले आहे. स्वस्तात विमान प्रवास घडविणा-या कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अशा शुल्काची गरज आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:22 AM2017-08-26T01:22:45+5:302017-08-26T01:23:21+5:30

प्रवाशांकडील अतिरिक्त सामानावरील (एक्सेस बॅगेज) वाढीव शुल्काचे स्पाइसजेटने जोरदार समर्थन केले आहे. स्वस्तात विमान प्रवास घडविणा-या कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अशा शुल्काची गरज आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

 SpiceJet strongly supported the above charges on the bags | बॅगेज् वरील अधिक शुल्काचे स्पाइसजेटने केले जोरदार समर्थन

बॅगेज् वरील अधिक शुल्काचे स्पाइसजेटने केले जोरदार समर्थन

नवी दिल्ली : प्रवाशांकडील अतिरिक्त सामानावरील (एक्सेस बॅगेज) वाढीव शुल्काचे स्पाइसजेटने जोरदार समर्थन केले आहे. स्वस्तात विमान प्रवास घडविणा-या कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अशा शुल्काची गरज आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
ठराविक नि:शुल्क सामान वाहतुकीची सुविधा आपल्या प्रवाशांना आहे, पण अतिरिक्त सामानावर वाढीव शुल्क आकारले नाही, तर स्वस्त विमान तिकीट देणे आम्हाला शक्यच होणार नाही, असे स्पाइसजेटचे मुख्य विपणन अधिकारी देबोजो महर्षी म्हणाले. नागरी विमान वाहतूक महासंचालकांचा १५ ते २0 किलो वजनी सामानासाठी प्रतिकिलो १00 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच रद्द केला. आधी कंपन्या त्यासाठी २२0 ते ३५0 रुपये आकारत होत्या.
महर्षी म्हणाले की, प्रवासी भाडे परवडणाºया दरात ठेवून अधिकाधिक भारतीयांना विमान प्रवासाची संधी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी अतिरिक्त सामानावर जादा शुल्क आकारण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. एखाद्याने अधिकचे सामान सोबत घेतले असेल, तर त्यासाठी त्याने अधिक शुल्क देण्यात काहीच गैर नाही.

एअर इंडियाशी तुलना नको
एअर इंडिया २३ किलोपर्यंतच्या सामानाला विमानात परवानगी देते, ही बाब निदर्शनास आणून दिली असता महर्षी म्हणाले की, एअर इंडिया ही संपूर्ण सेवादाता कंपनी आहे. त्यांचे भाडे खूपच अधिक आहे. त्यामुळे त्यांची सामानाची मर्यादाही अधिक आहे.
स्पाइसजेट स्वस्तात विमानसेवा देते. सहयोगी सेवांद्वारे महसूल वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जास्तीच्या सामानावर अधिक शुल्क आकारणे हा त्यातील एक मार्ग आहे. या शुल्कातून आम्हाला खर्च भागविणे शक्य होते.

Web Title:  SpiceJet strongly supported the above charges on the bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.