मुंबई : भारतीय विमान सेवा क्षेत्रातील स्पाईस जेटने आपल्या विमानांच्या ताफ्यात एक बोइंग ७३५ विमान सामील केल्याने स्पाईस जेटच्या ताफ्यातील विमानांची संख्या शंभर झाली आहे. एअर इंडिया, सध्या बंद पडलेली जेट एअरवेज आणि इंडिगोनंतरची हा पल्ला गाठणारी स्पाईस जेट ही चौथी भारतीय विमान सेवा कंपनी ठरली आहे.
एअर इंडिया, इंडिगो, स्पाईस जेट, गो एअर, एअर इंडिया एक्स्प्रेस, विस्तारा, एअर आशिया आणि अलायन्स या भारतीय विमान सेवा कंपन्यांच्या ताफ्यात आजघडीला ५९५ विमाने आहेत. मागच्या महिन्यात २३ विमाने ताफ्यात सामील करण्यात आली, असे स्पाईस जेटने म्हटले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये कंपनी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होती, तेव्हा स्पाईस जेटच्या ताफ्यात २०१९ मध्ये शंभर विमाने असतील, असा विचार कोणीही केला नसता, असे स्पाईस जेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले.
‘स्पाईस जेट’च्या ताफ्यात शंभर विमाने
भारतीय विमान सेवा क्षेत्रातील स्पाईस जेटने आपल्या विमानांच्या ताफ्यात एक बोइंग ७३५ विमान सामील केल्याने स्पाईस जेटच्या ताफ्यातील विमानांची संख्या शंभर झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:26 AM2019-05-27T05:26:39+5:302019-05-27T05:26:48+5:30