स्पिनिंग मिलवर आयकर धाडी
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:05+5:302015-02-13T00:38:05+5:30
>- कागदपत्रे व लॉकर्स ताब्यात : कारवाई सुरूचनागपूर : करचुकवेगिरी करणाऱ्या स्पिनिंग मिल आणि त्याच्याशी संबंधित प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने गुरुवारी धाडी टाकल्या. प्राप्त माहितीच्या आधारे विभागाने कारवाई केल्याची माहिती आहे. या कारवाईत कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, लॉकर्स, रोख अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली असून कारवाई उद्याही सुरू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. भगीरथ टेक्सटाईल आणि श्री गोपाल रमेशकुमार सेल्स प्रा.लि. अशी फर्मची नावे आहेत. सुती धाग्याचे उत्पादन आणि विक्रीचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. रमेश रांदड हे संचालक आहे. भगीरथ टेक्सटाईल ही जिनिंग आणि स्पिनिग मिल कळमेश्वर येथे आहे. दोन्ही फर्मचे कार्यालय गांधीबाग येथे आहे. शिवाय निवासस्थानही कार्यालयाच्या ठिकाणी आहे. विभागाचे ५० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालय, निवास्थान, कळमेवर येथील मिलवर एकाच वेळी धाडी टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. या फर्मतर्फे सुती धाग्याची देशात विक्री केली जाते. या शिवाय रमेश रांदड यांचे माहेश्वरी ग्रेनाईट नावाने फर्म असल्याची माहिती आहे. या फर्मअंतर्गत राजस्थान येथे खाणी आहे. या फर्मचा व्यवसाय मध्य भारतासह राजस्थान, मध्य प्रदेश आणि अन्य राज्यात पसरला आहे. या फर्मची विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी आणि चौकशी केल्याची माहिती आहे. विस्तृत माहिती देण्यास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.