Join us  

फक्त एका ऑर्डरनं 'या' कंपनीचा शेअर बनला रॉकेट, अचानक वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 5:57 PM

या शेअरची खरेदी एवढी वाढली, की त्याला अपर सर्किटही लागले.

फक्त एका ऑर्डरमुळे गेल्या शुक्रवारी एसपीएमएल इन्फ्राच्या (SPML Infra) शेअरनं रॉकेट स्पीड घेतला आहे. या शेअरची खरेदी एवढी वाढली, की त्याला अपर सर्किटही लागले.

शेअरचा भाव 60 रुपयांच्या पुढे -  व्यापाराच्या शेवटी, एसपीएमएल इन्फ्राच्या शेअरची किंमत सुमारे 5 टक्क्यांनी वाढून 60.75 रुपयांवर पोहोचली होती. 9 फेब्रुवारीरोजी हा शेअर 63.35 रुपयांच्या स्थरावर होता. जो 52 आठवड्यांची सर्वोच्च स्थर होता. बाजार भांडवलासंदर्भात बोलायचे झाल्यास, ते 222 कोटी रुपये एवढे आहे.

मिळाली अशी ऑर्डर - एसपीएमएल इंफ्राला राजस्थानात पाणी पुरवठा प्रोजेक्टची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीनुसार, ही ऑर्डर 1,157.08 कोटी रुपयांची आहे. राजस्थान सरकार इसरदा धरण प्रकल्पाच्या माध्यमाने दौसा आणि सवाई माधोपूर जिल्ह्यांना पेयजल उपलब्ध करून देणार आहे.

या कामांतर्गत 341 किलोमीटरची ट्रांसमिशन पाईपलाईन, इसरदा, दौसा येथे डब्ल्यूटीपी, दोन पंपिंग स्टेशन्स, दोन स्वच्छ पाण्याचे जलाशय आणि इतर काही सिव्हिल कामांसह इंटेक पंपिंग स्टेशनवर 33 केव्ही वीजेचे सबस्टेशन तयार करण्याच्या कामांचा समावेश आहे. ही कामे दोन वर्षांत पूर्ण केली जातील.  

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारबाजार