नवी दिल्ली : फोर्ड इंडियाने हॅचबॅक श्रेणीतील फिगो आणि कॉम्पॅक्ट श्रेणीतील सेडान अॅस्पायर या दोन कारच्या स्पोर्ट्स एडिशन बाजारात आणल्या आहेत. फोर्डच्या ताफ्यातील या दोन्ही गाड्या लोकप्रिय आणि कमालीच्या क्षमतावान आहेत.नव्या एडिशनमध्ये डझनभर नवे फिचर कंपनीने घातले आहेत. फिगो स्पोर्ट्स एडिशनची दिल्लीतील एक्स-शोरूम किंंमत ७,२१,६00 रुपये (डिझेल टायटॅनिअम) आणि ६,३१,९00 रुपये (पेट्रोल टायटॅनिअम) आहे. फोर्ड अॅस्पायर स्पोर्ट्स एडिशनची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ७,६0,६00 रुपये (डिझेल टायटॅनिअम) आणि ६,५0,९00 रुपये (पेट्रोल टायटॅनिअम) आहे.फोर्ड इंडियाचे कार्यकारी संचालक (मार्केटिंग, सेल अँड सर्व्हिसेस) अनुराग मल्होत्रा यांनी सांगितले की, फ्रेश, डायनॅमिक, स्पिरिटेड आणि स्पोर्टी असलेल्या या नव्या गाड्या ग्राहकांना खरी ड्रायव्हिंगमधील मौजमस्ती अनुभवायला देण्यास सज्ज आहेत. या दोन्ही गाड्यांनी आपल्या विभागात आधीच मानाचे स्थान निर्माण केले आहे. स्पोर्ट्स एडिशनने त्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.आक्रमक आणि प्रभावी लूक असलेल्या दोन्ही गाड्यांचे एक्स्टेरिअर अगदी शार्प आणि फ्रेश आहे. फिगोला ब्लॅक हनीकॉम्ब ग्रिल दिले आहे. आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर तिची शोभा वाढवितो. अॅस्पायरलाही नवी ग्रील देण्यात आली आहे.दोन्ही गाड्यांचे इंटेरिअर ब्लॅक आहे. फिगोच्या सीट्स रेड स्टीचिंगच्या, तर अॅस्पायरचे केबिन फॉग ग्रे स्टिचिंगच्या आहेत.नव्या गाड्यांची वैशिष्ट्ये-सटीक, तेज आणि प्रतिसादात्मक स्टिअरिंग, स्थिर आणि पूर्वअनुमानीय हँडलिंगफिगोमध्ये रिअर स्पॉइलर बसविण्यात आला आहे. त्यामुळे गाडीची कामगिरी उंचावेल.गाड्यांचा लूक अधिक ट्रेंडी करण्यात आला आहे. सस्पेशन्स अधिक आखीव करण्यात आले आहेत. १५ इंची अॅलॉय व्हिल देण्यात आले आहेत.दोन्ही गाड्यांत ड्युअल फ्रंट ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग्ज आहेत. एबीएस आणि ईबीडी या यंत्रणा गाडीला अधिक सुरक्षित करतात.या गाड्यांत ‘मायफोर्ड डॉक’ फिचर देण्यात आले आहे. त्यामुळे चालकास स्टोअरिंग आणि माउंटिंगची सोय मिळते. मोबाइल चार्जिंग, एमपी ३ प्लेअर, सॅटेलाइट नेव्हिगेशन सीस्टिम या सोयी मिळतात. नको असेल, तेव्हा हा डॉक बंद करून जागा मोकळी करता येते.दोन्ही नव्या गाड्यांचे स्टअरिंग लेदर रॅप्ड आहे. विरोधी रंगसंगती त्यात वापरण्यात आली आहे.
फोर्डने आणल्या फिगो, अॅस्पायरच्या स्पोर्टस् आवृत्त्या
By admin | Published: April 24, 2017 1:07 AM