एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्सची (SRM Contractors) शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्सचे शेअर्स बीएसईवर 225 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स 210 रुपयांना मिळाले. एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्सचे शेअर्स बीएसईवर सुमारे 7 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले आहेत. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स एनएसईवर 2.5 टक्के प्रीमियमसह 215.25 रुपयांवर लिस्ट आहेत. कंपनीचा आयपीओ 26 मार्च ते 28 मार्चदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता.
पहिल्याच दिवशी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर लिस्ट झाल्यामुळे एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्सचे शेअर्सना अपर सर्किटवर लागलंय. बीएसईवर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 236.20 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजारातील कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 226 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या आयपीओची एकूण साईज 130.20 कोटी रुपये होता. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 99.92 टक्के होता, जो आता 72.92 टक्क्यांवर आला आहे.
86 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब
कंपनीचा आयपीओ एकूण 86.57 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 46.97 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा (NII) 214.94 पट सबस्क्राईब झाला. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा 59.59 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये, किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 70 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14700 रुपये गुंतवावे लागणार होते. एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्सची स्थापना 2008 साली झाली. एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स ही एक कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट कंपनी आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)