Adani Group and Hindenburg: काही दिवसांपूर्वीच अमेरिकन अमेरिकन रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच संस्थापक नेट अँडरसन पुन्हा चर्चेत आला होता. त्यानं आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा आहे. कोणत्याही कायदेशीर किंवा इतर धोक्यामुळे आपण आपल्या कंपनीचा व्यवसाय बंद करत नाहीत आणि त्यांनी जाहीर केलेल्या सर्व रिपोर्ट्सनवर अजूनही ठाम आहेत, असं त्यानं म्हटलंय. "हिंडेनबर्गनं २०२३ चा रिपोर्ट ज्यात अदानी समूहावर कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला होता," असं अँडरसरननं पीटीआय भाषाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर ही कंपनी प्रकाशझोतात आली. अदानी समूहाने अहवालातील सर्व आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.
काय म्हटलं अँडरसननं?
ओसीसीआरपी आणि जॉर्ज सोरोस सारख्या कथित भारतविरोधी गटांशी हिंडेनबर्गचा संबंध जोडण्याचा काहींचा प्रयत्न हा कट असल्याचं अँडरसननं म्हटलं. आपल्या संस्थेनं त्यांच्यावर कधीही भाष्य केलेलं नाही कारण ते अशा ''Silly conspiracy theories' ना प्रोत्साहन न देण्याच्या धोरणाचं पालन करत असल्याचं म्हटलं. अँडरसननं अनेक कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप करत अनेक सविस्तर अहवाल सादर केलेत.
मात्र, गेल्या महिन्यात त्यांनी आपल्या कंपनीचा व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली. हिंडेनबर्गचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्याऐवजी कंपनीची सूत्रं दुसऱ्या कोणाकडे सोपविण्याचा निर्णय घेणार का असा सवालही त्यांना करण्यात आला."मला ब्रँडपासून वेगळे करण्याचा कोणताही मार्ग नाही,'' असं उत्तर त्यानं दिलं.
दुसऱ्याकडे सोपवू शकत नाही
"हिंडेनबर्ग प्रामुख्यानं माझा पर्याय आहे. जर हा हे कोणतं सॉफ्टवेअर असतं किंवा सायकलचा कारखाना असता तर तुम्ही ते विकू शकता. परंतु हे माझ्याद्वारे करण्यात आलेलं अॅनालिसिस आहे, तुम्ही वास्तविक ते कोणाला देऊ शकत नाही. जर ही टीम कोणता नवा ब्रँड आणू शकत असेल तर मी आनंदानं त्याचं समर्थन करेन. ते असं करतील अशी मला अपेक्षा आहे," असं त्यानं स्पष्ट केलं.
अदानींच्या रिपोर्टवर ठाम
"आम्ही आमच्या सर्व निष्कर्षांवर ठाम आहोत," असं अदानींवरील रिपोर्टवर बोलताना अँडरसननं सांगितलं. हिंडेनबर्गनं जानेवारी २०२३ मध्ये एक रिपोर्ट सादर केला होता. त्यात अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. यामध्ये शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचा आणि आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण यानंतर अदानी समूहाकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं होतं.