Join us  

स्टार हेल्थच्या 3 कोटी विमाधारकांचा डेटा लीक, हॅकर्सनी मागितली 57 लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 9:09 PM

Star Health Data Breach: स्टार हेल्थने याविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

Star Health Insurance Data Leak: भारतातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थवर सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे करोडो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टार हेल्थच्या 3 कोटींहून अधिक ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेली आहे. हा डेटा परत करण्यासाठी कंपनीकडे $68,000 (सुमारे 57 लाख) खंडणी मागण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅकरने वेबसाइट आणि टेलिग्राम चॅटद्वारे सार्वजनिक डोमेनमध्ये कर माहिती आणि वैद्यकीय रेकॉर्डसह संवेदनशील माहिती लीक केली. डेटा लीक झाल्यामुळे स्टार हेल्थने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. याशिवाय कंपनीने कायदेशीर कारवाईही केली आहे. याशिवाय, ही घटना घडवून आणणाऱ्या हॅकरला शोधण्यात मदत करण्यासाठी भारतीय सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांचीही मदत मागितली आहे.

खंडणीची मागणीस्टार हेल्थचे म्हणणे आहे की, ते या सायबर हल्ल्यांच्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, हॅकरने ऑगस्टमध्ये एक ईमेल पाठवून $68,000 (सुमारे 57 लाख रुपये) खंडणीची मागणी केली होती. स्टार हेल्थचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ यांना हा मेल आला होता.

लीक झालेला डेटाया खुलाशानंतर कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी घसरले आहेत. हॅकरने चोरलेल्या डेटामध्ये करविषयक संवेदनशील माहिती आणि वैद्यकीय दाव्याच्या नोंदींचा समावेश आहे. हा डेटा टेलिग्राम आणि हॅकरद्वारे चालवल्या जाणाऱ्या विशेष वेबसाइटवर लीक झाला आहे. स्टार हेल्थने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. याशिवाय कंपनीने हॅकर आणि टेलिग्रामविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :सायबर क्राइमव्यवसायगुन्हेगारी