Lokmat Money > बिझनेस न्यूज > Starbucks: कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार! यादी तयार

Starbucks: कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार! यादी तयार

Starbucks layoffs news: स्टारबक्स कंपनीने कर्मचारी कपात करण्याच्या निर्णय घेतला आहे. ११०० कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 10:19 IST2025-02-25T10:16:32+5:302025-02-25T10:19:45+5:30

Starbucks layoffs news: स्टारबक्स कंपनीने कर्मचारी कपात करण्याच्या निर्णय घेतला आहे. ११०० कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 

Starbucks: Starbucks, famous for its coffee, will lay off 1100 employees! List ready | Starbucks: कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार! यादी तयार

Starbucks: कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार! यादी तयार

कॉफी आणि स्टारबक्स हे समीकरणच बनले आहे. जगभरात विस्तार असलेल्या या प्रसिद्ध ब्रॅण्डला कॉफीप्रेमीची चांगली पसंती आहे. टाटा उद्योग समूहासोबत ज्वॉईंट व्हेंचर असलेली स्टारबक्स आता मोठी कर्मचारी कपात करणार आहे. ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार असून, त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

स्टारबक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कंपनीची पुर्नरचना करण्याचा भाग म्हणून या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. 

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, स्टारबक्स कॉर्प एकूण कर्मचाऱ्यांपैकी ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. चेअरमन आणि सीईओ ब्रायन निकोल यांनी गेल्यावर्षी म्हणजे सप्टेंबर २०२४ मध्ये पदभार हाती घेतल्यानंतर कंपनीचा व्यवसाय मंदावला आहे. विक्रीमध्ये घट झाली आहे. त्याच दरम्यान कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली.

सोमवारी एक पत्र जारी करण्यात आले आहे, ज्यात म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे. त्यांना मंगळवारी याबद्दलची माहिती दिली जाईल. 

मे पर्यंत पगार आणि इतर लाभ मिळणार

ब्रायन निकोल यांनी २०२५ च्या सुरूवातीलाही याचे संकेत दिले होते. मार्च महिन्याच्या सुरूवातीला स्टारबक्स कर्मचारी कपातीचा निर्णय घेऊ शकते, असे ते म्हणाले होते. 

११०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याबरोबरच कंपनीतील जी पदे रिक्त आहेत, ती कायमची रद्द केली जाणार आहेत. जगभरात स्टारबक्सचे १६००० कर्मचारी आहेत. स्टारबक्सचे ८० देशांमध्ये ३६००० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. 

कोणत्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार?

रिपोर्टनुसार, स्टारबक्सचे सीईओ निकोल यांनी कर्मचारी कपातीसंदर्भात एका पत्रातून याबद्दलची माहिती दिली. आमचे उद्दिष्ट अधिक कौशल्यपूर्ण पद्धतीने काम करणे, उत्तरदायित्व वाढवणे आणि किचकट कार्यपद्धती कमी करण्याला प्रोत्साहन देण्याचे आहे. 

रोस्टिंग आणि वेअर हाऊसशी संबंधित कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे, त्यांना २ मे २०२५ पर्यंत पगार आणि इतर लाभ दिले जाणार आहेत. 

Web Title: Starbucks: Starbucks, famous for its coffee, will lay off 1100 employees! List ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.