Join us  

थोड्याशा गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा पाच लाखांपर्यंत होईल कमाई, सरकारकडून मिळेल ८५ टक्के सब्सिडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 4:38 PM

Business Idea: गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे आता कमी गुंतवणुकीत चांगली कमाई होणाऱ्या व्यवसायांची सुरुवात करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

मुंबई - गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेक जणांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे आता कमी गुंतवणुकीत चांगली कमाई होणाऱ्या व्यवसायांची सुरुवात करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्हाला आज आम्ही अशीच एक चांगली बिझनेस आयडिया सांगणार आहोत. ज्यामाध्यमातून तुम्ही कमी गुंतवणुकीत अधिकाधिक लाभ मिळवू शकाल. (Start this business with a small investment, earn up to Rs 5 lakh per month, get 85% subsidy from the government)

कोरोनाच्या काळात इतर सर्व उद्योगांना मोठा फटका बसला असला तरी कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरले आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला कृषी क्षेत्राशी जवळचा संबंध असलेल्या मधमाशी पालनाबाबत माहिती देणार आहोत. अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही मधमाशी पालन सुरू करू शकता. तसेच यासाठी तुम्हाला सरकारकडून सब्सिडीसुद्धा मिळू शकते.   मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून कृषी आणि बागायतीचे उत्पादनही वाढवता येते. यासाठी पाळीव मधमाशांचे कृत्रिम पेटीत पालन केले जाते. या पेट्या शेतामध्ये किंवा बागांमध्ये ठेवल्या जातात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मधमाशांच्या कॉलनीला सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिक मधुमक्षिका पालक संघटनांकडून त्यासाठीच्या विशिष्ट्य क्षेत्राची माहिती घ्या. मधमाशांचे स्थान आणि तुमच्या भागात सामान्यपणे उत्पादित होणाऱ्या मधाची माहिती घ्या. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदा उत्पादन झाल्यावर तुमच्या मधमाशी पालनाच्या कार्याचे मूल्यांकन करा. तुमच्याकडील मधमाशांच्या पोळ्यांची देखभाल करण्याच्या तंत्राचा आढावा घेण्यासाठी मधुमक्षिका पालक संघासोबत काम करा. तुमचा होणारा खर्च आणि मध व मेणाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना करा.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या शहराच्या किंवा गावाच्या कार्यालयामधून व्यवसाय परवाना घेऊ शकता. तसेच अन्य परवानग्यांबाबतही माहिती घेऊ शकता. तसेच मधमाशीशी संबंधित उत्पादनांची विक्री करण्यासाठी परवान्यांसाठी राज्याच्या महसूल विभागाशी संपर्क साधा. तसेच राज्याच्या मधुमक्षिकापालन विषयक कायद्यांबाबत कृषी वकिलाकडून सल्ला द्या.  काही ऑर्गेनिक मधाची किंमत ही खूपच अधिक असते. मात्र बहुतांश ठिकाणी मधाची किंमत ही ६९९ ते एक हजार रुपयांदरम्यान, असते. तसेच मधुमक्षिका पालनामधून तुम्ही बीजवेक्सस रॉयल जेली, प्रोपोलिस अशी काही अन्य उत्पादनेही मिळतात.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून धान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी मधुमक्षिका पालनासाठी एक केंद्रीय योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये या सेक्टरच्या विकास करणे, उत्पादन क्षमता वाढवणे,  प्रशिक्षण देणे आणि जागरुकता करणे यांचा अंतर्भाव आहे. राष्ट्रीय मधुमक्षिका बोर्डाने नाबार्डसोबत मिळून भारतामध्ये मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी वित्तीय योजना सुरू केल्या आहेत. ते या क्षेत्रात महिलांच्या रोजगारासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही जवळच्या राष्ट्रीय मधुमक्षिका बोर्डाच्या कार्यालयात जाऊ शकतात. तसेच संकेतस्थळावरून माहिती मिळवू शकता. सरकार मधुमक्षिका पालनावर ८० ते ८५ पर्यंत सब्सिडी देते. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जर तुम्ही या व्यवसायाला कमीत कमी गुंतवणुकीच्या माध्यमातून सुरुवात करू शकता. तुम्हाला या माध्यमातून दर महिन्याला पाच लाखांपर्यंत कमाई होऊ शकते.  

टॅग्स :व्यवसायपैसाभारत