Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या 50 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल मोठी कमाई, जाणून घ्या सविस्तर...

अवघ्या 50 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल मोठी कमाई, जाणून घ्या सविस्तर...

Business Idea : या व्यवसायात तुम्ही केवळ 50 हजार रुपये गुंतवून महिन्याला कोट्यवधींची कमाई करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 12:55 PM2021-07-11T12:55:16+5:302021-07-11T12:56:33+5:30

Business Idea : या व्यवसायात तुम्ही केवळ 50 हजार रुपये गुंतवून महिन्याला कोट्यवधींची कमाई करू शकता.

start online hording business only in rs 50 thousand and earn per month 1 crore rupees check how | अवघ्या 50 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल मोठी कमाई, जाणून घ्या सविस्तर...

अवघ्या 50 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल मोठी कमाई, जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली :  एक चांगली बिझिनेस आयडिया (New Business Idea) कोणताही व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला यशस्वी उद्योजक (Successful entrepreneur) बनण्यात मदत करते. जर तुम्हालाही घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू (Starting own business) करणार असाल असेल तर, आज आम्ही तुम्हाला एका शानदार व्यवसायाची आयडिया देत आहोत. या व्यवसायात तुम्ही केवळ 50 हजार रुपये गुंतवून महिन्याला कोट्यवधींची कमाई करू शकता. हा व्यवसाय म्हणजे 'ऑनलाइन होर्डिंग्ज' (Online Hoardings Business). आजच्या डिजिटल युगात, ऑनलाईन होर्डिंग्जचा व्यवसाय अनेकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

या व्यवसायाच्या माहिती संदर्भात न्यूज 18 ने गो होर्डिंग्स डॉट कॉम (Gohoardings.com) या आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनीच्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा (Deepti Awasthi Sharma) यांच्याशी संवाद साधला. या व्यवसायातून दीप्ती दरमहा 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत आहेत. चला तर जाणून घेऊया... ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय कसा सुरू करू करायचा? आणि यातून कसे पैसे कमवायचे?

वर्षाला कोटींची कमाई

दीप्ती अवस्थी शर्मा यांनी सन 2016 मध्ये ऑनलाइन होर्डिंग्जचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी त्या अवघ्या 27 वर्षांच्या होत्या. जास्त पैसे नसल्याने दीप्ती यांनी केवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून ऑनलाइन होर्डिंगचे काम सुरू केले. पुढच्या वर्षी दीप्ती यांच्या कंपनीने 12 कोटींची कमाई केली होती. एका वर्षानंतर दीप्ती यांच्या कंपनीची उलाढाल 20 कोटींच्या वर गेली.

जाणून घ्या, कसा सुरू करायचा हा व्यवसाय?
या व्यवसाय मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू केला जाऊ शकतो. यासाठी, आपल्याला चांगल्या डोमेन नावासह एक वेबसाइट तयार करावी लागेल. या वेब साइटला स्वतःच प्रमोट करावे लागेल. सुरुवातीला लोक जाहिरातीसाठी कुठे स्थान शोधत आहेत, याचं संशोधन करा. त्यासाठी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकता. मागील काही काळात हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. कारण लोकं घरात बसून जाहिरात करण्याला पसंती देत आहेत.

जाणून घ्या, कसे करते कंपनी काम?
सर्वात आधी ग्राहकांना गो होर्डिंग्ज डॉट कॉमच्या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर, वेबसाइटवर जाऊन आपल्याला ज्याठिकाणी होर्डिंग्ज लावायचे आहे, ते ठिकाण निवडावे लागेल. ठिकाण निवडल्यानंतर, कंपनीला एक मेल जातो. त्यानंतर कंपनी वेबसाइटच्या माध्यमातून संबंधित ठिकाण उपलब्ध आहे का? याची पुष्टी करून ग्राहकांना माहिती देते. यानंतर ग्राहकांकडून आर्टवर्क आणि ऑर्डर घेतली जाते. संबंधित ठिकाणी लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी वेबसाइटकडून एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. अशा पद्धतीने हॉर्डिंग्ज लावण्यासाठी कंपनीकडून महिन्याला एक लाख रुपयांटचे शुल्क घेतले जाते.

Web Title: start online hording business only in rs 50 thousand and earn per month 1 crore rupees check how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.