Join us

2 लाखांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा होईल 1 लाख रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 5:47 PM

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाल सरकारकडून 4 लाखांपर्यंतचे कर्जदेखील मिळू शकते.

नोकरीसोबतच तुम्ही अतिरिक्त उत्पन्नासाठी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. ज्याद्वारे तुम्ही कमीत कमी पैशात छोटा व्यवसाय सुरू करू शकता आणि दरमहा लाखोंमध्ये कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला एका बिझनेस आयडियाबद्दल सांगत आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही फक्त 2 लाख रुपयांपासून करू शकता. विशेष म्हणजे, या व्यवसायात तुम्हाला सरकारकडून मदतही मिळेल.

पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करा

तुमच्याकडे 2 लाख रुपये असतील तर या पैशातून तुम्ही पापड व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने एक प्रकल्प अहवाल आणला आहे. याद्वारे तुम्ही मुद्रा लोन अंतर्गत परवडणाऱ्या दरात 4 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. आपल्या शहरासोबतच तुम्ही इतर शहरांमध्ये जाऊनही आपला माल विकू शकता. यातून तुम्हाला दरमहा सूमारे एक लाख रुपयांची कमाई होऊ शकते. पण, हे तुमच्या मालाच्या विक्रीवर अवलंबुन आहे.

एकूण खर्च किती असेल

एकूण 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुमारे 30 हजार किलो उत्पादन क्षमता तयार होईल. या क्षमतेसाठी, 250 चौरस मीटर जमीन आवश्यक आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 6.05 लाख खर्च करावे लागतील (एकूण खर्चात स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल समाविष्ट आहे). 

मनुष्यबळ किती लागेलया व्यवसायात स्थिर भांडवलामध्ये पापड बनवणारी मशीन, पॅकेजिंग मशीन, उपकरणे यांसारख्या सर्व खर्चाचा समावेश होतो. यामध्ये कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांचे पगार, कच्चा माल आणि तीन महिन्यांतील उपयुक्तता उत्पादन खर्च यांचा समावेश होतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यात समावेश आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी

यासाठी तुमच्याकडे जागा असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जागा नसेल तर ती भाड्याने घेता येईल, त्यासाठी तुम्हाला दरमहा 5-10 हजार रुपये भाडे द्यावे लागेल. मनुष्यबळात 3 अकुशल कामगार, 2 कुशल कामगार आणि एक पर्यवेक्षक ठेवावा लागेल. त्यांच्या पगारावर 25,000 रुपये खर्च केले जातील, जे खेळत्या भांडवलात जोडले गेले आहे. देशात अनेकजण हा व्यवसाय करत असून यातून दरमहा सूमारे एक लाख रुपयांची कमाई होते.

टॅग्स :व्यवसायलघु उद्योग