Join us

100 रुपयांपासून करा NSC या सरकारी योजनेत गुंतवणूक, मिळणार जबरदस्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 9:16 AM

छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर असतं.

नवी दिल्ली- छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर असतं. या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर जास्त व्याजदराबरोबरच टॅक्समध्ये सूट मिळते. 1 ऑक्टोबरपासून 5 वर्षं एनएससीवर मिळणारं व्याजदर 7.6 टक्क्यांवरून वाढून 8 टक्के करण्यात आला आहे. खरं तर एवढं जास्त व्याजदर देशातली कोणतीही बँक देत नाही. त्यामुळे तुम्ही एनएससीमध्ये पैसे गुंतवणे जास्त फायदेशीर ठरू शकतं.  

  • 100 रुपयांत उघडलं जातं खातं- पोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेतील गुंतवणूक 5 वर्षांसाठी करता येते. भारतीय पोस्ट ऑफिसनुसार, या योजनेंतर्गत कमीत कमी 100 रुपयांमध्ये खातं उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच कालमर्यादा तुम्हाला वाढवताही येऊ शकते. 
  • कुठे उघडलं जाणार खातं- एनएससीअंतर्गत देशभरातील पोस्ट ऑफिसच्या ब्रँचमध्ये खातं उघडलं जाऊ शकते. 
  • कोण करू शकतं गुंतवणूक- कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावेसुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेतील मर्यादा 5 वर्षांसाठी आहे. व्याज दरवर्षी वाढत जातं आणि त्यात कंपाऊंड इंटरेस्टमुळे पैसे वाढत जातात. तसेच तुम्ही केलेल्या 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवरच फक्त टॅक्समध्ये सूट मिळते. विशेष म्हणजे ही योजना सरकारी आहे. खरं तर तुमचे पैसे या योजनेत पूर्णतः सुरक्षित आहेत. सरकारनं ठरवल्यास तुम्हाला या योजनेतून जास्त परतावा मिळू शकतो. तसेच तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही. 
  • कुठे खरेदी करू शकता सर्टिफिकेट- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचं एक माध्यम आहे. यात निश्चित व्याजदरावर गुंतवणूकदाराला फायदा मिळतो. भारतातील पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेंतर्गत खातं उघडता येऊ शकतं. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट खरेदी करण्याची प्रक्रिया साधी-सोपी आहे. तुम्ही पोस्टाच्या कोणत्याही ऑफिसमधून हे सर्टिफिकेट खरेदी करू शकता. परंतु नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काही आवश्यक दस्तावेजांची पूर्तता करावी लागते. तसेच फॉर्ममधून तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागते, ज्यात तुम्हाला नाव आणि गुंतवणुकीच्या रकमेचा उल्लेख करावा लागेल. तसेच यासाठी तुम्ही धनादेश किंवा रोख रक्कमही देऊ शकता. 
  • कधी काढू शकता पैसे- या योजनेची कालमर्यादा 5 वर्षांची असते. विशेष म्हणजे तुम्ही दिलेल्या अटीचं व्यवस्थित पालन केल्यास 1 वर्षांनंतरही तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमधील व्याजदर दर 3 महिन्यांनी बदलण्यात येते. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेतील व्याजदरात चढ-उतार होत राहतात. या योजनेचा लाभ 18 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तीला मिळू शकतो. या योजनेत अल्पवयीनांना गुंतवणूक करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत संयुक्तरीत्याही गुंतवणूक करता येते. परंतु परदेशी नागरिक आणि हिंदू संयुक्त कुटुंबाला याचा लाभ मिळणार नाही. 
टॅग्स :पोस्ट ऑफिस