Lokmat Money > बिझनेस न्यूज > पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 50 हजारांत सुरू करा "हा" व्यवसाय, महिन्याला कराल 30 ते 40 हजारांची बक्कळ कमाई 

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 50 हजारांत सुरू करा "हा" व्यवसाय, महिन्याला कराल 30 ते 40 हजारांची बक्कळ कमाई 

Small Business Idea : स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे. पैसै कमवण्याची सुवर्णसंधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 09:49 AM2021-01-16T09:49:25+5:302021-01-16T10:05:03+5:30

Small Business Idea : स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे. पैसै कमवण्याची सुवर्णसंधी आहे.

start shirt printing business and earn in lakhs new and small business idea | पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 50 हजारांत सुरू करा "हा" व्यवसाय, महिन्याला कराल 30 ते 40 हजारांची बक्कळ कमाई 

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 50 हजारांत सुरू करा "हा" व्यवसाय, महिन्याला कराल 30 ते 40 हजारांची बक्कळ कमाई 

नवी दिल्ली  - नोकरी करण्यापेक्षा अनेकांचा सर्वाधिक कल हा व्यवसाय करण्याकडे असतो. साधारण आठ ते नऊ तासांची शिफ्ट करण्यापेक्षा काहींची अधिक पसंती ही एखाद्या व्यवसायाला असते. स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे. पैसै कमवण्याची सुवर्णसंधी आहे. फक्त 50 हजारांत व्यवसाय सुरू करून महिन्याला 30 ते 40 हजारांची बक्कळ कमाई करता येणार आहे. टी-शर्ट प्रिंटिंगचा (T-Shirt Printing) हा व्यवसाय असून याला सध्या बाजारात सर्वाधिक मागणी आहे. वाढदिवस असो किंवा कोणताही विशेष प्रसंग, आजकाल लोक बर्‍याचदा आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि खास लोकांना या प्रकारची भेटवस्तू देत असतात. 

सध्या खास मेसेज असलेले, हटके स्टाईलमध्ये प्रिंट केलेले टी-शर्ट घालण्याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. विविध शाळा, कंपन्या आणि संस्थांमध्ये कित्येक प्रसंगी अथवा सणसमारंभांना हवे तसे टी शर्ट प्रिंट केले जाते. एकूणच या व्यवसायातून बराच फायदा होतो. या व्यवसायाची खासियत म्हणजे कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय घरच्या घरी देखील सुरू करता येतो. 50 हजार ते 70 हजार रुपयांची गुंतवणूक करून टी-शर्ट प्रिंटींगचा व्यवसाय सुरू करू शकता. यातून महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमवू शकता. या व्यतिरिक्त यात यशस्वी ठरल्यास आपली गुंतवणूक वाढवून आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवता येते. 

एका टी-शर्टवर कमीतकमी 50 टक्के नफा

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कपड्यांवर प्रिटींग करणारी मशीन ही 50 हजार रुपयांना येते आणि त्यातूनच काम सुरू करता येतं. प्रिटींगसाठी लागणाऱ्या सामान्य पांढर्‍या टी-शर्टची किंमत सुमारे 120 रुपये आहे आणि त्यावर केल्या जाणाऱ्या प्रिंटीगसाठी 1 ते 10 रुपयांदरम्यान खर्च येतो. टी-शर्ट प्रिंट करून झाल्यानंतर आपण ते कमीत कमी 250 ते 300 रुपयांपर्यंत विकू शकतो. एका टी-शर्टवर कमीतकमी 50 टक्के नफा मिळू शकतो. यानंतर यातून येणारे उत्पन्न वर्षाला लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंतही असू शकतं.

ऑनलाइन विक्री करणं आहे सोपं

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. ऑनलाईन खरेदी-विक्री ही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळेच आपल्या टी-शर्ट प्रिंटींग व्यवसायाचं मार्केटीग करण्यासाठी सोशल मीडिया हा योग्य प्लॅटफॉर्म आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे एक ब्रँड तयार करून विक्री करता येते. मागणी वाढली की हळूहळू आपण आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवू शकतो. व्यवसायाच्या या वाढीदरम्यान, आपण एक मोठी मशीन देखील वापरू शकतो जी चांगल्या प्रतीची आणि अधिक संख्येने टी-शर्ट प्रिटींग करू शकते. यामध्ये 1 मिनिटात एक टी-शर्ट तयार होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: start shirt printing business and earn in lakhs new and small business idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.