Join us

आजच सुरू करा 'पोस्ट ऑफिस', पहिल्या दिवसापासूनच होणार बंपर कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 4:54 PM

पोस्ट ऑफिस आपल्याला नवनव्या योजना उपलब्ध करून देत असते. पोस्टात गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतात.

नवी दिल्ली- पोस्ट ऑफिस आपल्याला नवनव्या योजना उपलब्ध करून देत असते. पोस्टात गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी पोस्टानं आपल्याला नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. पोस्टाच्या माध्यमातूनही आपण व्यवसाय सुरू करू शकतो. परंतु त्यासाठी पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी घ्यावी लागणार आहे. भारतीय पोस्ट ऑफिसात फ्रेंचायझी (शाखा) घेऊन आपणही व्यवसाय करू शकता. 

  • कशा विकत घ्याल फ्रेंचायझी(शाखा)

जर आपल्याला फ्रेंचायझी घ्यायची असल्यास 5 हजार रुपये सुरक्षिततेसाठी पोस्टात जमा करून ठेवावे लागतात. तुम्ही पोस्टातून जितके जास्त व्यवहार कराल, तितकी तुमची कमाई जास्त होईल. सुरक्षित ठेव ही NSCतर्फे घेतली जाते. जी व्यक्ती फ्रेंचायझी घेते, त्या व्यक्तीला सेलेक्शन डिव्हिजनलचं हेड केलं जातं. त्यानंतर 14 दिवसांच्या आत ASP/SDlच्या रिपोर्टच्या आधारावर निवड केली जाते. 

  • फ्रेंचायझी(शाखा)साठी काय आहेत नियम

फ्रेंचायझी घेण्यापूर्वी पहिल्यांदा फॉर्म भरून सबमिट करावा लागतो. निवड झाल्यानंतर भारतीय पोस्टात MoU साइन(सामंजस्य करार) करावा लागतो. फ्रेंचायझी घेण्यासाठी कमीत कमी 8वी पास असावे लागते. तसेच फ्रेंचायझी घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांहून अधिक असलं पाहिजे. 

  • कोण घेऊ शकते फ्रेंचायझी

पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी कोणीही घेऊ शकते. यात छोट्या छोट्या दुकानदारांपासून व्यावसायिकही पोस्ट ऑफिसात फ्रेंचायझी उघडू शकतात. संघटना, संस्था, लघु मध्यम व्यवसायिक, विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) नागरिक यासारखे अनेक संस्था किंवा संघटना पोस्टाची शाखा मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

  • पोस्टातून मिळणारा नफा

पोस्ट ऑफिसच्या शाखे(फ्रेंचायझी)चे उत्पन्न हे कमिशनवर अवलंबून असते. पोस्टाकडून शाखा घेतलेल्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला व्यवसाय पुरवला जातो. या सर्व सेवांनुसार पोस्टाची शाखा घेतलेल्या त्या संबंधित व्यक्तीला नफाच्या रकमेवर टक्केवारी दिली जाते. या सर्व गोष्टींची माहिती सामंजस्य करारात नमूद केलेली असते. पोस्ट ऑफिस आपल्याला स्टँप आणि स्टेशनरी, साधारण कुरिअर, स्पीड पोस्ट आणि मनी ऑर्डर बुकिंग करण्याची सेवा देत असते. तसेच बिल, टॅक्स आणि दंडाची रक्कमही आपल्याला पोस्टाद्वारे भरता येते. 

  • पोस्टाकडून मिळतात या सुविधा 

रजिस्टर्ड पोस्टाच्या बुकिंगवर 3 रुपये, स्पीड पोस्टाच्या बुकिंगवर 5 रुपये, 100 ते 200 रुपयांच्या मनी ऑर्डरवर 3.50 रुपये, 200पेक्षा अधिकच्या मनी ऑर्डरवर 5 रुपये, प्रत्येक महिन्यात 1000पेक्षा अधिक  साधारण आणि स्पीड पोस्टचा व्यवसाय करून दिल्यास अतिरिक्त 20 टक्केवारी, पोस्टाची तिकिटे, स्टेशनरी आणि मनी ऑर्डरचे अर्ज विक्रीतून मिळालेल्या रकमेतून 5 टक्के अधिकचा नफा, रेव्हेन्यू स्टँप आणि केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या विविध पदांसाठीच्या परीक्षेसाठी लागणारे स्टँप आणि तत्सम वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचे 40 टक्के रकमेचा फायदा आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून होतो. 

टॅग्स :पोस्ट ऑफिस