आोट : आकोट आगारातून आता थेट पंढरपूरकरिता दररोज एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज १ जुलै रोजी या एसटी सेवेचा शुभारंभ बस स्थानकावर पार पडला.या एसटी बसचा शुभारंभ आगारप्रमुख संजय हुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पत्रकार रामदास काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाहक एन. जे. देशमुख व चालक बंकुवाले, एसटी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. पंढरपूर बस ही आकोट आगारामधून दररोज सकाळी ८ वाजता निघणार आहे तर दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता पंढरपूर बस स्थानकावर आकोटकरिता लागणार आहे. शेगाव, खामगाव, बीड मार्गे ही बस जाणार असून प्रवाशांनी, विठ्ठल भक्तांनी एसटी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख हुसे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)फोटो : ०१एकेटीपी०४.जेपीजी
आकोट ते पंढरपूर एसटी बस सेवा सुरू
आकोट : आकोट आगारातून आता थेट पंढरपूरकरिता दररोज एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज १ जुलै रोजी या एसटी सेवेचा शुभारंभ बस स्थानकावर पार पडला.
By admin | Published: July 1, 2014 09:43 PM2014-07-01T21:43:33+5:302014-07-01T21:43:33+5:30