Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजपासून मॅकडोनाल्डची 43 दुकाने बंद

आजपासून मॅकडोनाल्डची 43 दुकाने बंद

मॅकडोनाल्डची 55 पैकी 43 दुकाने आजपासून बंद झाली आहेत. कनॉट प्लाझा रेस्टॉरंट समूहातर्फे उत्तर आणि पूर्व भारतात मॅकडोनाल्डची रेस्टॉरंट चालवली जातात.

By admin | Published: June 29, 2017 03:53 PM2017-06-29T15:53:14+5:302017-06-29T16:00:38+5:30

मॅकडोनाल्डची 55 पैकी 43 दुकाने आजपासून बंद झाली आहेत. कनॉट प्लाझा रेस्टॉरंट समूहातर्फे उत्तर आणि पूर्व भारतात मॅकडोनाल्डची रेस्टॉरंट चालवली जातात.

Starting today, McDonald's closed 43 shops | आजपासून मॅकडोनाल्डची 43 दुकाने बंद

आजपासून मॅकडोनाल्डची 43 दुकाने बंद

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 29 - दिल्लीमधील मॅकडोनाल्डची 55 पैकी 43 दुकाने आजपासून बंद झाली आहेत. कनॉट प्लाझा रेस्टॉरंट समूहातर्फे उत्तर आणि पूर्व भारतात मॅकडोनाल्डची रेस्टॉरंट चालवली जातात. मॅकडोनाल्ड आणि सीपीआरएल समूह 50:50 टक्के संयुक्त भागीदार आहेत. मागच्या काही दिवसांपासून मॅकडोनाल्ड आणि सीपीआरएल समूहामध्ये वाद सुरु होते. त्यातूनच रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
यामुळे 1700 कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. हा निर्णय दुर्देवी आहे पण सीपीआरएलतर्फे चालवण्यात येणारी 43 दुकाने बंद तात्पुरती बंद करत आहोत असे विक्रम बक्क्षी यांनी सांगितले. विक्रम बक्क्षी आणि त्यांची पत्नी सीपीआरएलच्या बोर्डावर असून, मॅकडोनाल्डचे दोन प्रतिनिधी या बोर्डामध्ये आहेत. बुधवारी स्काळी स्काईपव्दारे झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  बंद करण्याचा निर्णय का घेतला ? त्याचे ठोस कारण सीपीआरएलने दिले नाही.
 
पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्यासंबंधी बंधनकारक असलेल्या परवान्याचे नूतनीकरण न झाल्याने ही रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. विक्रम बक्क्षी यांना ऑगस्ट 2013 मध्ये तडकाफडकी सीपीआरएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी मॅकडोनाल्ड विरुद्ध कायदेशीर लढाई सुरु करुन मॅकडोनाल्डला कंपनी लॉ बोर्डामध्ये खेचले. कंपनी लॉ बोर्डाने या प्रकरणी अद्याप अंतिम निकाल दिलेला नाही. मॅकडोनाल्डने लंडन आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या लवादाकडे बक्क्षी यांच्या विरोधात दाद मागितली आहे.  
 
 

Web Title: Starting today, McDonald's closed 43 shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.