Join us

ज्यांच्यासाठी एवढं केलं तेच...! ‘सहाराश्रीं’ना दोन मुलं, खांदा द्यायलाही आले नाही; नातू करणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 3:18 PM

Subrata Roy Death: कधी काळी, आपल्या दोन मुलांच्या लग्नासाठी राजकारणापसून ते चित्रपटसृष्टीतील सर्वच दिग्गजांना लखनौमध्ये आमंत्रित करणाऱ्या सुब्रत रॉय यांच्या अंत्यसंस्कारासाठी, त्यांची मुलं उपस्थित राहणार नाहीत.

सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय (Sahara Chief Subrata Roy) यांचे मंगळवारी निधन झाले. अगदी स्कूटरवरून नमकीन विकून करिअरची सुरुवात केलेल्या सुब्रत रॉय यांनी हजारो कोटी रुपयांचा कारभार उभा केला होता. एकेकाळी त्यांचा कारभार, रिअल इस्टेट, फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया, मनोरंजन, आरोग्य सेवा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, माहिती तंत्रज्ञान आणि एअरलाइन क्षेत्रांपर्यंत विस्तारला होता. पण, आयुष्यभर ग्लॅमरने वेढलेले सुब्रत रॉय सहारा मृत्यूसमयी मात्र एकाकी होते. त्याच्यासोबत कुटुंबातील सदस्य नव्हते. 

मुलांचा खांदाही नशीबी नाही -कधी काळी, आपल्या दोन मुलांच्या लग्नासाठी राजकारणापसून ते चित्रपटसृष्टीतील सर्वच दिग्गजांना लखनौमध्ये आमंत्रित करणाऱ्या सुब्रत रॉय यांच्या अंत्यसंस्कारासाठी, त्यांची मुलं उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांचा नातू हिमांक रॉय आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहे. पण, ज्या मुलांकडे वृद्धापकाळाचा सहारा म्हणून पाहीले जाते, अशी दोन्ही मुले मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नसतील.

सुब्रत यांच्या भोवती असायचा दिग्गजांचा गराडा -माध्यमांतील वृत्तांनुसार, सुब्रत रॉय यांचे दोन्ही मुले सुशांतो आणि सीमांतो हे परदेशात आहेत आणि ते आपल्या वडिलांच्या अंत्य यात्रेत सहभागी होऊ शकणार नाहीत. याच दोन मुलांच्या लग्नात जगाने सुब्रत रॉय यांची राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील ताकद बघितली होती. मात्र आत, ते एकाकीपणे जग सोडून गेले आहेत आणि परिस्थिती अशी आहे की, त्यांची मुलंही या अंत्यसंस्कारावेळी त्याच्यासोबत नाहीत. पण एक काळ असाही होता, तेव्हा सुब्रत यांच्या भोवती दिग्गजांचा गराडा असायचा, अगदी राजकीय नेतेही त्यांच्या भेटीसाठी रांगेत असायचे.

...अन् सुब्रत यांचे निकटवर्तीयही त्यांच्यापासून दूर होऊ लागले -मात्र, काळाने कलाटणी घेतल्यानंतर, अनेकांनी त्यांची साथ सोडली. कॉर्पोरेट जगतात तुरा रोवणाऱ्या सहारा समूहाचे वाईट दिवस सुरू झाल्यानंतर, सुब्रत यांचे निकटवर्तीयही त्यांच्यापासून दूर होऊ लागले. परिस्थिती एवढी बदलली की, त्यांच्यावर कारागृहात जाण्याचीही आणि बदनामीचीही वेळ आली. खरे तर, तेव्हा सहाराचे उगवते साम्राज्य बघणाऱ्यांना या घटनांवर विश्वासही बसत नव्हता. 

सुब्रत यांची पत्नी स्वप्ना रॉय आणि छोटा मुलगा  सीमांतो यांचा मोठा मुलगा हिमांक लखनऊमध्य पोहोचले आहेत. हिमांक आपल्या आजोबांवर अंत्यसंस्कार करेल. 

 

टॅग्स :व्यवसायमृत्यू