Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टार्टअप कंपन्यांमध्ये नोकरकपातीची नांदी, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना नारळ

स्टार्टअप कंपन्यांमध्ये नोकरकपातीची नांदी, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना नारळ

नवीन वर्षात अनेक कर्मचाऱ्यांना नारळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 05:37 AM2019-12-24T05:37:08+5:302019-12-24T05:37:27+5:30

नवीन वर्षात अनेक कर्मचाऱ्यांना नारळ

Startup companies have hired employees, coconuts for employees in the new year | स्टार्टअप कंपन्यांमध्ये नोकरकपातीची नांदी, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना नारळ

स्टार्टअप कंपन्यांमध्ये नोकरकपातीची नांदी, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना नारळ

बंगळुरू : भारतातील तंत्रज्ञानाधिष्ठित स्टार्टअप कंपन्यांतील वृद्धीचा कालखंड संपला असण्याचे संकेत मिळत असून, ओयो, ओला, पेटीएम आणि क्विकर यासारख्या मोठ्या स्टार्टअप कंपन्यांनी खर्च कपात करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून नोकर कपात सुरू केली आहे. २०२० हे वर्ष कंपन्यांसाठी खडतर राहणार असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.

क्विकरने आपल्या ३ हजार कर्मचाऱ्यांपैकी १ हजार कर्मचाºयांना घरी पाठविले आहे. ही कपात कंपनीच्या एकूण श्रमशक्तीच्या एक तृतीयांश आहे. कंपनीने ‘अ‍ॅट होम दिवा’ ही सौंदर्य सेवाही बंद केली आहे. ओयोकडून भारतातील २५० ते ५०० कर्मचाºयांना घरी बसविले जाणार असल्याचे समजते. आॅगस्टमध्ये कंपनीकडे ९ हजार कर्मचारी होते. ओलाकडून १५ ते २० टक्के नोकर कपात केली जाणार असल्याचे वृत्त होते. कंपनीची कर्मचारी संख्या ५,८०० ते ६,००० आहे. कंपनी काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने कर्मचारी कपात करणार आहे.
एका आॅनलाइन न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमने ५०० कर्मचाºयांना कामावरून काढले
आहे. 

क्विकरच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही अलीकडेच काही श्रेणीतील आमच्या व्यवसायात फेरबदल सुरू केले आहेत. या बदलांचा परिणाम म्हणून काही प्रमाणात आमच्या श्रमशक्तीचे व्यवहारीकरण होणे अपेक्षित आहे. ओलाचा प्रवक्ता म्हणाला की, खर्च कपातीसाठी कंपनीची पुनर्रचना केली जात असून, याचा भाग म्हणून कर्मचारी कमी केले जात आहेत.

 

Web Title: Startup companies have hired employees, coconuts for employees in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी