Join us

स्टार्टअप्समधून दररोज 100 हून अधिक लोक झाले बेरोजगार, 3 महिन्यांत 9000 पेक्षा जास्त लोकांनी गमावल्या नोकऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:31 PM

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्टार्टअप्समध्ये कोल्ड फंडिंग सीझनमुळे हे दिसून आले आहे. याचा अर्थ देशात स्टार्टअप्समुळे 9000 हून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

नवी दिल्ली : स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या बाबतीत भारत जगातील अव्वल देशांपैकी एक असला, तरी मार्च तिमाही भारतीय स्टार्टअप्ससाठी खूपच वाईट आहे. या तीन महिन्यांत स्टार्टअप्समधून दररोज 100 हून अधिक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्टार्टअप्समध्ये कोल्ड फंडिंग सीझनमुळे हे दिसून आले आहे. याचा अर्थ देशात स्टार्टअप्समुळे 9000 हून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 

ईटीच्या रिपोर्टमध्ये करिअरनेटचा हवाला देत असे म्हटले आहे की, देशातील स्टार्टअपमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. मार्च तिमाहीत या स्टार्टअप्समधून 9,400 लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कर्मचारी कपात ही मालिका येत्या काही दिवसांतही सुरू राहू शकते. एडटेक फर्म बायजू, अनअॅकेडमी, शेअरचॅट, मायगेट, गोमॅकॅनिक अशा काही स्टार्टअप्स आहेत, ज्यांनी आपल्या टीममधून लक्षणीय कर्मचारी कपात केली आहे. स्टार्टअप्सनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. प्रत्येक स्टार्टअपमध्ये 100 ते 300 लोकांची कपात दिसून आली आहे. यामध्ये डन्झो, हेल्थटेक स्टार्टअप इनोव्हाकार, ओला यांचाही समावेश आहे.

या कर्मचारी कपातीदरम्यान, कपातीचा टप्पा आणखी पुढेही सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे, दुसऱ्या आणि मार्च तिमाहीत वरिष्ठ पदांच्या भरतीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी घट झाली आहे. हा ट्रेंड फिनटेक, ईकॉमर्स, एडटेक, सास आणि हेल्थटेक तसेच इतर कंपन्यांमध्ये दिसून आला आहे. ईकॉमर्स आणि एडटेक कंपन्यांनी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 93 टक्के आणि 84 टक्के भरतीवर परिणाम केला आहे. रिपोर्टनुसार, मार्च तिमाहीत एडटेक कंपन्यांमध्ये 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांची मोठी कपात दिसून आली.

कोट्यवधींच्या डील्स अडकल्यातईटीने करिअरनेटच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, या कालावधीत 260 फंडिंग डील अंडर रिव्ह्यू आहेत. या कालावधीत स्टार्टअप्सद्वारे सुमारे 3.4 बिलियन डॉलर उभारण्यात आले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 72 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी या काळात कंपन्यांनी 12 बिलियन डॉलर मिळवला होता. यापैकी 214 मिलियन डॉलर किमतीच्या 110 डील्स सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि 41 डील्स प्री-सीरीज टप्प्यात आहेत, ज्यांचे मूल्य 163 मिलियन डॉलर दिसून येत आहे. ग्रोथ स्टेजमध्ये 55 डील्स सुरू आहेत, ज्याचे मूल्य 887 मिलियन डॉलर आहे. 24 डील्समध्ये उशीर होत आहे, ज्याचे मूल्य 2.1 बिलियन डॉलर आहेत.

टॅग्स :व्यवसाय