Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टार्टअप कंपन्यांत झाली 6.5 कोटी डॉलरची गुंतवणूक

स्टार्टअप कंपन्यांत झाली 6.5 कोटी डॉलरची गुंतवणूक

जून तिमाहीत १६० व्यवहार पूर्ण; ११ कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये समाविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:26 AM2021-08-23T06:26:45+5:302021-08-23T06:26:58+5:30

जून तिमाहीत १६० व्यवहार पूर्ण; ११ कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये समाविष्ट

Startups got investment of 6.5 crore dollar | स्टार्टअप कंपन्यांत झाली 6.5 कोटी डॉलरची गुंतवणूक

स्टार्टअप कंपन्यांत झाली 6.5 कोटी डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्ली : देशाच्या स्टार्टअप कंपन्यांना चालू कॅलेंडर वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत ६.५ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळाली आहे तर ११ स्टार्टअप कंपन्या प्रतिष्ठित युनिकॉर्न क्लबमध्ये समाविष्ट झाल्या आहेत, युनिकॉर्न एक कोटी डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकनात आहे, असे नास्कॉम-पीजीए लॅब्जच्या एका अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार दुसऱ्या तिमाहीत स्टार्टअप कंपन्यांत गुंतवणुकीचे १६० व्यवहार पूर्ण झाले. ते जानेवारी-मार्च  कालावधीच्या तुलनेत दोन टक्के जास्त आहेत.
अहवाल म्हणतो की, “२०२१ ची दुसरी तिमाही स्टार्टअपच्या वाढीसाठी आकर्षक राहिली. या तिमाहीत स्टार्टअप कंपन्यांत सर्वात जास्त वित्तपोषण मिळाले. या दरम्यान, युनिकॉर्नच्या संख्येत सर्वात जास्त वाढ झाली. कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत भारतीय स्टार्टअप पारिस्थितिकी तंत्राने आपल्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले.”

जून तिमाहीत भारतीय स्टार्टअप्सला ६.५ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळाली. ती तिमाही-दर-तिमाही आधारावर ७१ टक्के वाढ झाली.
पीजीए लॅब्सचे संचालक, कॉम्पिटिटिव इंटेलिजेंस अभिषेक मैती म्हणाले की, ‘‘जून, २०२१ पर्यंत ५३ यूनिकॉर्नवाले भारतीय स्टार्टअप पारिस्थितिकी तंत्राने एप्रिल-जून तिमाहीत खूप चांगली कामगिरी केली.” 
मैती म्हणाले की, लॉकडाऊन निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यानंतर पुढील सहामाहीतही व्यवहारांचा विचार करता भारतीय बाजाराची स्थिती चांगली दिसत आहे.

सर्वात जास्त वित्तपोषण मिळाले
तिमाहीत सर्वात मोठा व्यवहार फूड डिलिव्हरी मंच स्विगीचा होता. स्विगीने या दरम्यान ८० कोटी डॉलरचा निधी जमवला. शेअरचॅटने ५०.२ कोटी डॉलर, बायजूसने ३४ कोटी डॉलर, फार्मईजीने ३२.३ कोटी आणि मिशोने ३० कोटी डॉलर जमवले. 
याशिवाय पाइन लॅब्सने २८.५ कोटी डॉलर, देल्हीवेरीने २७.७ कोटी डॉलर, जेटाने २५ कोटी डॉलर, क्रेडने २१.५ कोटी डॉलर आणि अर्बन कंपनीने  १८.८ कोटी डॉलर जमवले.

Web Title: Startups got investment of 6.5 crore dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.