लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बंगळुरू, चेन्नई किंवा हैदराबादसारख्या ‘सिलिकॉन व्हॅली’ असे बिरुद मिरवणाऱ्या शहरांचे आकर्षण संपेल की काय, असे वाटू लागले आहे. कारण देशातील टायर टू समजल्या जाणाऱ्या शहरांत आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि सॉफ्टवेयर एज ए सॉल्यूशन (सास) या टेक स्टार्टअप कंपन्यांची संख्या वेगाने वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करणारी तरुणाई ‘गड्या आपला गाव बरा...’ म्हणत पुणे, नागपूर, कोच्ची, भोपाळ, चंडीगड, रायपूर, अहमदाबाद, जबलपूर, कोईम्बतूर या शहरांत आनंदाने परत येत आहे.
‘नॅस्कॉम-डेलॉय’च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत या टायर टू शहरांत कंपन्यांचा खर्च सुमारे ४० टक्क्यांनी कमी येतो. कर्मचाऱ्यांची कमतरता नसते, कारण याच शहरांतून मुले-मुली नोकरीसाठी हब असलेल्या शहरांत जातात. आता ते आपल्याच शहरांत मध्यम पगाराची नोकरी पत्करतात.
काय आहेत कारणे?
छोट्या शहरांतील स्टार्टअपकडून कमी खर्चात दर्जेदार काम. संसाधनांचा वेगाने विकास, हुशार मनुष्यबळाची सहज उपलब्धता, स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प. छोट्या शहरांत वाहतूक समस्या नसणे, स्वस्त जागा, सरकारकडून स्टार्टअपसाठी इन्सेंटिव. टायर टू शहरांत राहण्याचा खर्च मोठ्या शहरांच्या तुलनेत २५-३५ टक्क्यांनी कमी. चांगले शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा.
६०% स्नातक छोट्या शहरांत तयार होतात. ११-१५% टॅलेंट छोट्या शहरांत सापडते. २०२३ पर्यंत भारत होईल टॅलेंट सरप्लस देश.
५४ लाख देशात टेकींची संख्या.
देशातील टॉप शहरे
एआय स्टार्टअप सास स्टार्टअप
चंडीगड १४१ २५
गुडगाव ३६५ ९०६
नोएडा ८९८ १८९
जयपूर ३३८ ५४
नवी दिल्ली ४३ -
इंदूर २२२ ४८
नागपूर २५ -
सुरत १८० १८०
ठाणे १२९ १२९
कोईम्बतूर २५३ ४३