Join us

State Bank Of India चं मोबाईल अ‍ॅप वापरताय?; बँकेनं केलं सतर्क राहण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 10:36 AM

पोलीस किंवा केव्हायसीसाठी फोन करणाऱ्यांपासूनही सावध राहण्याचं बँकेचं आवाहन

ठळक मुद्देपोलीस किंवा केव्हायसीसाठी फोन करणाऱ्यांपासूनही सावध राहण्याचं बँकेचं आवाहनबँकेनं ट्वीट करत दिली माहिती

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यादरम्यान रोख रकमेपेक्षा डिजिटल देवाणघेवाणीत मोठ्या प्रमाणात वाढही होत आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांना ठगांपासून सावध राहण्याचं तसंच कोणत्याही अनोळखी स्त्रोताचा वापर करन अ‍ॅप डाऊनलोड न करण्याचं आवाहन केलं आहे.Mahindra कंपनीनं सुरू केली Oxygen On Wheels सेवा; महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेशयाशिवाय ग्राहकांनी आपला ईमेल आयडी, एसएमएस किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडिया खात्यावरून येणाऱ्या माहितीला उत्तर देऊ नये, ती माहिती कितीही आकर्षक वाटत असली तरी त्याला उत्तर न देण्याचं आवाहनही स्टेट बँकेनं केलं आहे. "आम्ही आमच्या ग्राहकांना ठगांपासून सावध राहण्याचा आणि कोणत्याही अनोळखी स्त्रोतावरून अ‍ॅप डाऊनलोड न करण्याचा सल्ला देत आहोत," असं ट्वीट स्टेट बँकेनं केलं आहे.  आपली जन्म तारीख, डेबिट कार्ड नंबर, डेबिट कार्ड पीन, सीव्हीही, ओटीपीसारखी महत्त्वाची माहिती कोणालाही देऊ नये असं आवाहन स्टेट बँकेनं केलं आहे. तसंच स्टेट बँक, रिझर्व्ह बँक, पोलीस किंवा केव्हायसीसाठी फोन करणाऱ्यांपासूनही सावध राहण्याचं आवाहन बँकेनं केलं आहे. 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाऑनलाइनसायबर क्राइम