सध्या ऑनलाईन बँकिंग अनेकांच्या पैशांच्या व्यवहारासाठी मुख्य स्त्रोत बनला आहे. युपीआयद्वारे अनेक जण छोटे मोठे व्यवहार करताना दिसतात. जर तुन्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल आणि तुन्हाला तुमचा युपीआय आयडी डिसेबल करायचा असेल तर आता बँकेच्या ब्रान्चमध्ये जाण्याची तुन्हाला गरज नाही. तुम्ही घरबसल्या अगदी सोप्य पद्धतीनं आपला युपीआय आयडी डिसेबल करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियानं ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.
"जर तुम्हाला युपीआय रद्द करायचं असेल तर ऑनलाईन सेवा अथवा YONO च्या माध्यमातून घरबसल्या तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकाल," असं स्टेट बँकेनं ट्वीट करत सांगितलं आहे. नेट बँकिंगद्वारे ही सेवा बंद करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला SBI Internet Banking वर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर माय प्रोफाईल सेक्शन ओपन करा. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला डिसेबल/अनेबलचा ऑप्शन दिसून येईल. त्यावर क्लिककरा. तुमचा अकाऊंट नंबर सिलेक्ट करून त्या ठिकाणी डिसेबल या ऑप्शनवर क्लिक करा.
Want to enable/disable your UPI services in your account? You can easily do that via Online SBI or YONO SBI. Enjoy our online services from your comfort zone. Stay home, stay safe.#SBIAapkeSaath#StayStrongIndia#OnlineSBI#YONOSBI#BankSafepic.twitter.com/uFE1dDYAlp
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 22, 2021
Yono Bank द्वारे युपीआय डिसेबल करण्यासाठी YONO अॅपवर लॉग इन करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेला युपीआय टॅब ओपन करा. त्यानंतर डिसेबल अनेबल टॅबवर क्लिक करा. त्या ठिकाणी तुमचा अकाऊंट नंबर सिलेक्ट करून तुम्ही टर्न ऑफवर क्लिक करा. जर तुम्हाला भविष्यात पुन्हा एकदा जर युपीआय आयडी सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी असलेल्या टर्न ऑन या टॅबवर क्लिक करा.