Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक

State Bank Of India : एसबीआयच्या इतर खातेदारांनाही बँकेचे हे नियम माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास आपल्याला अडचण होणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:03 PM2021-05-25T20:03:26+5:302021-05-25T20:05:28+5:30

State Bank Of India : एसबीआयच्या इतर खातेदारांनाही बँकेचे हे नियम माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास आपल्याला अडचण होणार नाही.

state bank of india new debit card rules if you did not get your card then follow this process | SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक

नवी दिल्ली - स्टेट बँक इंडियामध्ये (State Bank Of India) खाते असेल आणि नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज केला असेल तर ही बाब तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच एसबीआयच्या इतर खातेदारांनाही बँकेचे हे नियम माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास आपल्याला अडचण होणार नाही. जेव्हा आपण नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँकेकडून एक कन्फर्मेशन येते की, आपले कार्ड पाठवले आहे, मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकालाही अशाच प्रकारची समस्या आली. त्यानंतर ग्राहकाने बँकेला टॅग केले आणि सोशल मीडियावर विचारले की, एटीएम डिस्पॅच केल्यानंतर डिलिव्हरी होण्यास किती वेळ लागेल. यावर एसबीआयने ट्विटरवरच माहिती दिली असून एटीएम न मिळाल्यास काय करावे हे सांगितले आहे. 

काय आहेत बँकेचे नियम?

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, डेबिट कार्ड इंडिया पोस्टद्वारे वितरीत केले जाते. तसेच बँकेने असा सल्ला दिला आहे की अशा प्रकारच्या डिलिव्हरीबद्दल जाणून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधला पाहिजे. जर पोस्ट ऑफिसद्वारे डिलिव्हरी केली गेली नसेल किंवा ती रिटर्न म्हणून मार्क केली गेली असेल तर ती सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॉक करण्यासाठी बँकेत पाठविली जाईल. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर हे कार्ड ग्राहकांच्या शाखेत पाठवले जाते, तेथून ग्राहक ते कलेक्ट करू शकतात. बँकेने सांगितले की ही संपूर्ण प्रक्रियेसाठी 10-15 दिवस लागतात आणि ते आपल्या पत्त्यावर देखील अवलंबून असते. बँकेच्या ट्वीटनुसार, तुम्हाला असे झाल्यास तुमची केवायसी कागदपत्रे व पासबुक घेऊन बँक शाखेत जा आणि एटीएम कार्ड कलेक्ट करा.

बँकेतून कट होताहेत पैसे

एसबीआयच्या अनेक खात्यांमधून पैसे वजा केले जात आहेत आणि एसबीआयकडून पैसे डेबिट केले जात आहेत. होय, एसबीआयकडून तुमच्या खात्यातून सर्व्हिस चार्ज 147 रुपये वजा केले जात आहेत. बँक एटीएम किंवा डेबिट कार्डसाठी मेंटेनन्स चार्ज वजा करते. हे शुल्क बँकेच्या वतीने दरवर्षी बँकेच्या खात्यातून वजा केले जाते. बँकेने स्वतः ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली असून बँकेच्या वतीने शुल्क म्हणून 147.50 रुपये वजा केल्याचे म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! बँकेत जाण्याची नाही गरज! फक्त एका फोनवर घरबसल्या झटपट होणार 'ही' कामं

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये खाते असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. बँकेतील व्यवहारासंबंधी कोणतेही काम करायचे असेल तर बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा ऑनलाईन लॉगिन करण्याची गरज नाही. फक्त एका फोनवर तुमचं काम आता झटपट घरबसल्या होऊ शकतं. एका फोनच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी बँकेची कामं अगदी सहज करू शकता. याची खासियत म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकता. जर, तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँक प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन पैसे पोहोचवेल करेल. याशिवाय पैसे जमा करायचे असतील तर बँक प्रतिनिधी पैसे जमा करण्याचं देखील काम करू शकतात. एसबीआयच्या ग्राहकांना यामुळे आपली कामं लवकर करता येणार आहेत. बँकेने सुरू केलेली सुविधा नेमकी काय आहे?, याचा कसा फायदा घ्यायचा? तसेच या खास सर्व्हिसचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया.

आजकाल अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी डोअर स्टेप बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बँक ग्राहकांना घरपोच बँक सेवा दिली जाते. यालाच डोअर स्टेप बँकिंग म्हणतात. बँक रोख रक्कम ग्राहकांना देणे, ग्राहकांकडून रक्कम स्वीकारणे, चेक जमा करुन घेणे, चेकची मागणी, फार्म 15H स्वीकराणे, डीमांड ड्राफ्ट डिलीव्हरी, टर्म डिपॉजिट सल्ला या शिवाय इतर सेवा देखील ग्राहकांना पुरवल्या जातात. केवायसी कागदपत्रे देखील स्वीकारली जातात. SBI ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग नागरिक आणि ज्यांचं वय 70 वर्षाहून अधिक आहे त्यांच्यासाठी डोअर स्टेप बँकिंग सुरु करण्यात आलं आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांचा मोबाईल नंबर त्यांच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. बँकेची वेबसाईट, मोबाईल App आणि नेट बँकिगद्वारे तुम्ही डोअरस्टेप बँकिंग सुरू करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही https://bank.sbi/dsb या वेबपेजवर भेट देऊ शकता. याशिवाय तुमचं खातं असलेल्या शाखेत देखील फोन करु शकता.

Web Title: state bank of india new debit card rules if you did not get your card then follow this process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.