नवी दिल्ली : जर तुम्ही गोल्ड लोन (Gold Loan) घेण्याचा प्लॅन आखत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये ग्राहकांना केवळ मिस कॉलद्वारे कर्ज मिळेल. याबाबतची माहिती बँकेने दिली आहे. विशेष म्हणजे, या गोल्ड लोनवर बँक ग्राहकांना अनेक सुविधा आणि ऑफर देत आहे. (state bank of india offering cheap gold loan with nil processing fees)
किती घेऊ शकता कर्ज?
एसबीआय गोल्ड लोन योजनेत सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त सोन्याची नाणीदेखील ठेवता येतील. एसबीआयने या योजनेंतर्गत कर्जाची जास्तीत जास्त रक्कम काही काळापूर्वी वाढविली होती. आता सोन्यावर 20000ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते. जे आधी 20 लाखांपर्यंत होते.
एसबीआयकडून ट्विट
एसबीआयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला स्वस्तात गोल्ड लोन घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून कस्टमर केअर नंबर 7208933143 वर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकेतून बॅककॉल येईल. या कॉलमध्ये तुम्हाला कर्जाबद्दल पूर्ण माहिती मिळेल. या व्यतिरिक्त तुम्ही 7208933145 वर "GOLD" असा मेसेज करून माहिती देखील मिळवू शकता.
7.5 टक्के व्याज दर
अधिक माहितीसाठी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळालाही भेट देऊ शकता. सध्या गोल्ड लोनवरील व्याज 7.5 टक्के आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.
Business ke liye achhi investment chaho toh #PehleSBI socho.
— State Bank of India (@TheOfficialSBI) February 21, 2021
Apply for a #GoldLoan with SBI and enjoy exciting deals like 7.50% Interest Rate, Nil Processing Fee, and many more.
For a call back, give a missed call on 7208933143 or SMS GOLD at 7208933145
#SBI#StateBankOfIndiapic.twitter.com/OiY1SWt7Rg
कोण घेऊ शकते एसबीआय गोल्ड लोन?
एसबीआय पर्सनल गोल्ड लोनसाठी 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती अर्ज करू शकतात. अर्ज एकाच किंवा संयुक्त आधारावर करता येतात. यासाठी अर्जदाराकडे उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असणे आवश्यक आहे. मात्र, लोन घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा देण्याची आवश्यक नाही.
एसबीआयची पर्सनल लोनची योजना
दरम्यान, याआधी एसबीआयने (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी पर्सनल लोनसंदर्भातील योजना आणली आहे. यामध्ये पर्सनल लोन (Personal Loan) हवं असणाऱ्या लोकांना मोठा लाभ मिळणार आहे. यासाठी बँकेमध्ये जाण्याची गरज नाही तर फक्त एका मिस कॉलने तुमचे काम सोपे होणार असून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एसबीआयने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ 7208933142 या क्रमांकावर फक्त एक मिसकॉल द्यायचा आहे. त्यानंतर बँक तुम्हाला लगेचच फोन करून याबाबत नेमकी माहिती देईल.
All it takes is an SMS, to begin with your personal loan process.
— State Bank of India (@TheOfficialSBI) February 16, 2021
SMS <PERSONAL> on 7208933145.
To know more: https://t.co/TH5bnGWu1Vpic.twitter.com/EJin90BhxV
पर्सनल लोनचे फीचर्स
- या पर्सनल लोनसाठी तुम्हाला 9.60 टक्के व्याजदर द्यावा लागणार आहे.
- 20 लाख रुपयांपर्यंतच पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता.
- कमी व्याज दर
- कमी प्रोसेसिंग चार्ज
- कमीतकमी कागदपत्रं लागणार
- झिरो हिडन कॉस्ट
- सिक्युरिटी आणि गॅरंटरची गरज भासणार नाही.