मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात राज्य मध्यवर्ती सरकारी बँकेच्या स्थितीत चांगली सुधारणा झाल्याने, सर्व भागधारकांसाठी बँकेने १०
टक्के लाभांशाची घोषणा केली होती. त्यानुसार, बँकेने राज्य सरकारला १० कोटी रुपयांचा लाभांश दिला. राज्य सरकारचे बँकेत १०० कोटी रुपयांचे भांडवल आहे. त्यापोटी सरकारला १० कोटी रुपये लाभांश देण्यात आला. बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एल. सुखदेवे आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा डिव्हिडंट वॉरंट सुपुर्द केला.
गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये १३ टक्के वाढ झाली आहे. कर्जा देण्यातही १४ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. ताळेबंद ११ टक्क्यांनी वाढला आहे.
राज्य बँकेकडून सरकारला १० कोटी रुपये लाभांश
गेल्या आर्थिक वर्षात राज्य मध्यवर्ती सरकारी बँकेच्या स्थितीत चांगली सुधारणा झाल्याने, सर्व भागधारकांसाठी बँकेने १० टक्के लाभांशाची घोषणा केली होती
By admin | Published: October 20, 2016 06:23 AM2016-10-20T06:23:18+5:302016-10-20T06:23:18+5:30