Join us

SBIच्या ग्राहकांसाठी तीन मोठी गिफ्ट्स, आता संपणार हे अतिरिक्त शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:14 PM

State Bank Of India's New Loan Scheme: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. SBIनं वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी (Processing Fees Wave Off) शून्य केली आहे. त्यामुळे आता वाहन कर्ज घेणार असल्यास वाहन कर्जा(Auto Loan)वर प्रोसेसिंग फीच्या नावे कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच बँकेचं पर्सनल लोन (Personal Loan) आणि एज्युकेशन लोन (Education Loan)चा परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवला आहे. आता आपण 6 वर्षांसाठीही पर्सनल लोन घेऊ शकता. अशा प्रकारे कर्ज घेतल्यास ईएमआयचा ग्राहकांवरचा बोजा कमी होतो. 

  • SBI वसूल करणार नाही प्रोसेसिंग फीस- बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, SBIनं फेस्टिव्ह सीझन लक्षात घेता वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फीस संपुष्टात आणली आहे. बँकेत सद्यस्थितीत वाहन कर्जावर 8.70 टक्के व्याजदर आकारला जातो. तसेच वाहन कर्ज डिजिटल माध्यम म्हणजेच YONO किंवा बँकेच्या वेबसाइटच्या माध्यमातून घेतल्यास 0.25 टक्के सूट मिळते. बँक सॅलरीच्या माध्यमातून ग्राहकाला वाहनाच्या किमतीवर 90 टक्के कर्ज मिळतं.  
  • काय असते प्रोसेसिंग फीस- आपण कोणतंही कर्ज घेण्यासाठी अर्ज केल्यास बँक आपल्याकडून प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फीस वसूल करते. पर्सनल लोनसाठीही दोन पर्याय उपलब्ध असतात. एका प्रकारात आपल्याला प्रोसेसिंग फीस द्यावी लागते. त्याशिवाय आपल्याला इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रांची पूर्तता करावी लागेत. पर्सनल लोनवर प्रोसेसिंग फीसच्या माध्यमातून 2-3 टक्के चार्ज वसूल केला जातो. 
  • घेऊ शकता 20 लाखांपर्यंतचं वैयक्तिक कर्जः SBIच्या फेस्टिव्ह सीझनच्या पार्श्वभूमीवर 20 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज मिळते. त्यासाठी बँक आपल्याकडून 10.75 टक्के व्याजदर वसूल करते. SBIनं परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवून 6 वर्षांचा केला आहे. त्यामुळे ग्राहकांवरचा EMIचा भार काहीसा कमी होणार आहे.   
  • एज्युकेशन लोनसंदर्भात घेतला मोठा निर्णयः जर आपल्याला परदेशात शिकण्यास जाण्याची इच्छा असल्यास आता एसबीआयचं एज्युकेशन लोन फायदेशीर ठरणार आहे. 50 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्जावर एसबीआय 8.25 टक्के व्याजदर वसूल करते. बँकेनं परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवून 15 वर्षांचा केला आहे. 
  • 1 सप्टेंबरपासून स्वस्त होणार गृह कर्जः SBIकडून गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदवार्ता आहे. एसबीआयकडून गृह कर्ज घेऊन घर खरेदी करणं स्वस्त झालं आहे. SBIनं गृह कर्जाच्या व्याजदरात 0.20 टक्के कपात केली आहे. 1 सप्टेंबरपासून गृह कर्जावरचं व्याजदर 8.05 टक्के होणार आहे. RBIने ऑगस्टमध्ये रेपो रेट कमी करून 5.40 टक्के केला आहे. त्यानंतर एसबीआयनं कर्जावरील व्याजदर घटवलं आहे. 
टॅग्स :एसबीआयकारघर