नवी दिल्ली- सरकारी बँक असलेल्या एसबीआयमध्ये अनेक ग्राहकांची खाती आहेत. या बँकेचा व्याजदर चांगला असल्यानं ग्राहक या बँकेत खाती उघडून पैसे गुंतवण्याला प्राधान्य देत असतात. तसेच एसबीआय ही बँक ग्राहकांना अनेक सुविधा पुरवत असते. परंतु अशातच एसबीआय बँकेनं अनेक सुविधा बंद केल्या आहेत. या सुविधांमध्ये बँकेशी संबंधित चार महत्त्वाच्या सुविधांचा उल्लेख आहे. त्यामुळे बँकेकडून याची माहिती देणारे मेसेजही तुम्हाला पाठवण्यात आले आहेत. त्या बँकेच्या मेसेजमधून जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन न केल्यास तुम्हाला 1 डिसेंबरपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 1 डिसेंबरपासून बँकेचं नेटबँकिंग काम करणार नाही. बँकेनं ग्राहकांना बँकेची वेबसाइट Online SBIवर नोटिफिकेशन पाठवून ही माहिती दिली आहे. 1 डिसेंबरपासून देशभरात नेटबँकिंग सुविधा ब्लॉक करण्यात येणार आहे. ग्राहकांना ही सुविधा सुरूच ठेवण्यासाठी बँकेत जाऊन मोबाइल नंबरची नोंदणी करावी लागणार आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची नेटबँकिंग सुविधा बंद होणार आहे.
- असा करा नंबर रजिस्टर
- तुम्हाला पहिल्यांदा www.onlinesbi.com वेबसाइटवर लॉगिन करा.
- त्यानंतर माय अकाऊंट आणि प्रोफाइल टॅबवर क्लिक करा
- प्रोफाइल टॅबवर पर्सनल डिटेल/मोबाइलवर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्याकडे प्रोफाइल पासवर्ड मागितला जाईल
- प्रोफाइल पासवर्ड हा लॉगिन पासवर्डपेक्षा वेगळा असतो.
- जेव्हा तुम्ही प्रोफाइल पासवर्ड सबमिट कराल, त्यावेळी तुम्हाल नोंदणीकृत मोबाइल नंबर, ईमेल आयडी दिसेल.
- जर मोबाइल नंबर दिसला नाही, तर बँकेत जाऊन तुम्हाला हा मोबाइल नंबर नोंदणीकृत करावा लागेल.
- पेन्शन धारकांना जीवन प्रमाणपत्र महत्त्वाचं
तसेच बँकेनं पेन्शन खातेधारकांनाही 30 नोव्हेंबरपूर्वीच जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितलं आहे. अन्यथा पेन्शन खातेधारकांचं खातं बंद होणार आहे. जर त्यांनी जीवन प्रमाणपत्र बँकेत जमा केले नाही, तर पेन्शन त्यांच्या खात्यात जाणार नाही. तसेच खातेधारक हे जीवन प्रमाणपत्र बँकेत जाऊन किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन जमा करू शकतात. जीवन प्रमाणपत्र बनवण्यासाठी केंद्र सरकारनं एक वेबसाइट सुरू केली आहे. jeevanpramaan.gov.in या माध्यमातून हे जीवन प्रमाणपत्र नोंदणीकृत करण्यात येणार आहे.
- बंद होणार एसबीआयचं Buddy अॅप
1 डिसेंबरपासून एसबीआय स्वतःचं मोबाइल वॉलेट असलेलं बड्डी अॅप पूर्णतः बंद करणार आहे. त्यामुळे तुम्ही या अॅपच्या माध्यमातून काही पैसे जमा केले असल्यास तात्काळ ते काढून टाका, जेणेकरून ते बुडणार नाही. बँकेनं आता योनो अॅप लाँच केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून लोकांना वॉलेटची सुविधा मिळणार आहे.
- पेन्शनधारकांचं कर्ज
एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन धारक कर्ज घेऊ इच्छित असल्यास त्यानं लवकरात लवकर त्यासाठी अर्ज करावा. बँकेनं फेस्टिव्ह सीझनच्या सुरुवातीलाच ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेणारे पेन्शन धारकांना कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग शुल्क द्यावं लागणार नाही. परंतु ही योजना 30 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. एसबीआयकडून हे कर्ज 76 वर्षांच्या कमी वयाचे असलेले केंद्रीय, राजकीय आणि लष्करातून निवृत्त झालेल्या व्यक्तींना देण्यात येतं.