मुंबई
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी सिक्यूरिटी टिप्स जारी केल्या आहेत. एटीएम वापरत असताना कोणत्या गोष्टींची खबरदारी बाळगायला हवी याबाबतची माहिती एसबीआयने दिली आहे.
बँकिंग सेवा अधिक सुरक्षित करण्यासाठी स्टेट बँक कठोर नियमांची अंमलबजावणी करत आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स नवनव्या पद्धतींचा वापर करत असतात.
एटीएम, डेबिट/ क्रेडिट कार्ड क्लोनिंग, सिम स्वॅप आणि इतर काही चुकीच्या पद्धतींचा वापर करुन हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे सध्याच्या काळात एटीएम कार्ड वापरतानाही काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे. जाणून घ्या...
>> एटीएम कार्डचा एटीएम मशीनमध्ये वापर करत असताना एटीएम मशीनचा कीपॅड तुमच्या हातांनी झाकून घ्या.
>> तुमचा एटीएम पिन/ कार्ड डिटेल्स कुणासोबतही शेअर करू नका.
>> एटीएम कार्डवर तुमचा एटीएम पिन कधीच लिहून ठेवू नका.
>> एटीएम कार्ड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती किंवा पिन फोन कॉल्सवर कधीच कुणाला देऊ नका. बँकिंग फोन कॉल्स कधीच तुम्हाला तुमचा पिन विचारत नाहीत.
>> एटीएमचा पिन हा तुमच्या वाढदिवसाची तारीख, गाडीच्या नंबर प्लेटचा क्रमांक, अकाऊंट नंबरशी साधर्म्य साधणारा ठेवू नका.
>> तुमच्या बँकिंग सेवेची मिळणारी स्लीप पूर्णपणे फाडून फेकून द्या किंवा तुमच्या जवळच ठेवा.
>> एटीएमचा वापर करताना कुठे काही छुपा कॅमेरा तर नाही ना? याची पडताळणी करून घ्या.
>> एटीएममध्ये पिन टाकत असताना किपॅडच्या जागेवर काही प्लास्टिक साधर्म्य कव्हर किंवा किपॅड सुयोग्य बसवलेला आहे ना? याची खात्री करून घ्या.