नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) करोडो ग्राहकांसाठी (SBI Customer) एक आनंदाची बातमी आहे. तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल आणि बँकिंग कामाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर आता तुम्ही तुमचे काम काही मिनिटांत सोडवू शकता. ग्राहकांची सोय लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने काही नंबर जारी केले आहेत, ज्यावर तुम्हाला बँकिंग सुविधा मिळणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता तुम्ही जाता जाता बँकिंग सहाय्यता मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये फक्त नंबर सेव्ह करावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन नंबर जारी केले आहेत, ज्यावर सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले की, बँकेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी तुम्ही 1800 1234 किंवा 1800 2100 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.
आता तुम्हाला बँकिंग सेवा 24x7 मिळेल.- खात्यातील बॅलन्स- शेवटचे 5 ट्रांजेक्शन- चेक बुकचे स्टेट्स - डीटीएस डिटेल्स- ई-मेलद्वारे डिपॉझिट इंट्रस्ट सर्टिफिकेट- नवीन एटीएम कार्डसाठी रिक्वेस्ट- जुने एटीएम कार्ड ब्लॉक करता येईल
तुम्ही YONO अॅपवरूनही माहिती मिळवू शकतायाशिवाय, SBI YONO मोबाइल बँकिंग अॅपद्वारे, तुम्ही तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती देखील मिळवू शकता. याशिवाय तुम्ही अॅपद्वारे ई-पासबुकही तयार करू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्सची संपूर्ण माहिती मिळेल.