स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारी बँक SBI शेतकऱ्यांना एक खास भेट देत आहे, ज्या अंतर्गत आर्थिक मदतीसह अनेक विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होणार असून, तसेच अनेक विशेष फायदेही मिळणार आहेत.
यासंदर्भात स्टेट बँकेने ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘एसबीआय अनेक वर्षांपासून शेतीशी संबंधित शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करत आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांना आर्थिक मदतही करत आहे,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलंय.
Khushhal Kisaan, Leharati Fasle!
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 20, 2022
Through the years, #SBI has helped farmers with their financial needs by developing solutions that are appropriate for their various agricultural needs.
We are more than simply a bank; we are the #StateBankOfHappiness.#SBI#AmritMahotsavpic.twitter.com/S24vWs7j5i
जारी केला एक व्हिडीओ
स्टेट बँकेनं एक व्हिडीओही जारी केला होता. यामध्ये लिहिलंय की, माझी बँक.. जी सोप्या पद्धतीनं किसान क्रेडिट कार्डाची सेवा देते. माझी बँक.. जी सोप्या पद्धतीनं ट्रँक्टर लोन मिळवून देते. माझी बँक… जी ॲग्रीकल्चरल लोननं सर्व शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करते. माझी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे.
केसीसीवर मिळतं कर्ज
किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या पैशावर सरकारकडून सबसिडी दिली जाते, ज्यामुळे त्यावर कमी व्याज द्यावे लागते.