नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाने पुढील पाच वर्षांत डेबिट कार्ड बंद करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहार डिजिटल व्हावा, यासाठी बँकने ही तयारी केल्याचे बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली आहे.देशात आज ९० कोटी डेबिट व ३ कोटी क्रेडिट कार्ड्स आहेत. त्यापैकी डेबिट कार्ड बंद करण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे. डिजिटल ट्रॅन्झक्शन व क्यूआर कोडचा आर्थिक व्यवहारांसाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, देशातील अनेक एटीएममध्ये आम्ही योनोची (यू ओन्ली नीड वन) सुविधा दिली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे केवळ मोबाइलद्वारेच पैसे काढणे शक्य होते व सर्व खरेदी व विक्रीचे व्यवहारही योनोमार्फत करता येतात. त्यामुळे ग्राहकांनी योनो कॅशसेवेचाच वापर करावा.काय आहे योनो?योनो सेवेद्वारे खात्यातून क्रेडिट कार्डशिवायही पैसे काढता येतात. ही मोबाइल फोन (अँड्रॉइड व आयओएस)वर सेवा असून, गुगल व अॅप स्टोअरवर हा अॅप उपलब्ध आहे. योनो अतिशय सोपी व सुरक्षित असून, सध्या ती सुविधा देणारी ६८ हजार एटीएम आहेत.
स्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 5:12 AM