Lokmat Money > बिझनेस न्यूज > विक्रीच्या प्रचंड दडपणाने बाजारावर अस्वलाचे राज्य

विक्रीच्या प्रचंड दडपणाने बाजारावर अस्वलाचे राज्य

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवशी मोठ्या विक्रीमुळे निर्देशांक कोसळले. त्यामुळे बाजाराने दोन महिन्यांचा तळ गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:22 AM2019-07-22T02:22:07+5:302019-07-22T02:22:18+5:30

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवशी मोठ्या विक्रीमुळे निर्देशांक कोसळले. त्यामुळे बाजाराने दोन महिन्यांचा तळ गाठला.

State of bears on the market with tremendous sales pressure | विक्रीच्या प्रचंड दडपणाने बाजारावर अस्वलाचे राज्य

विक्रीच्या प्रचंड दडपणाने बाजारावर अस्वलाचे राज्य

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परकीय वित्तसंस्थांना करामध्ये सवलत देण्यास स्पष्टपणे दिलेला नकार, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये येऊ घातलेली मंदी आणि विविध वस्तूंची कमी होत असलेली मागणी, यामुळे परकीय वित्तसंस्थांनी कायम राखलेली विक्री, तसेच काही आस्थापनांचे अपेक्षेपेक्षा कमी असलेले निकाल, यामुळे शेअर बाजारने वर्षभरातील तिसरी मोठी डुबकी घेतली. यामुळे अस्वलाची पकड आणखी घट्ट झाली.

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवशी मोठ्या विक्रीमुळे निर्देशांक कोसळले. त्यामुळे बाजाराने दोन महिन्यांचा तळ गाठला. अखेरच्या दिवशी निर्देशांकाच्या डुबकीने सन २०१९मधील तिसऱ्या क्रमांकाची घसरण नोंदविली गेली. बाजारात सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. त्यानंतर, निर्देशांक ३९,२८४.७३ अंशांपर्यंत आला. नंतर तो ३८,२७१.३५ अंशांपर्यंत घरंगळला. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक ३९९.२२ अंश म्हणजेच १.०३ टक्के खाली येऊन ३८३३७.०१ अंशांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजारातही मंदीचेच सावट राहिले. येथील निर्देशांकात (निफ्टी) १३३.२५ अंशांची (म्हणजेच १.१५ टक्के) अशी घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ११,४१९.२५ अंशांवर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकामधील घसरण सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सुमारे ४ टक्के घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप ४७५.५४ अंशांनी घसरून १४,०७८.३४ अंशांवर तर स्मॉलकॅप १३,३१०.३५ अंशांवर (घट ४६६.२३ अंश ) बंद झाले.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी ७,७१२ कोटी रुपये बाजारातून काढून घेतले. देशी वित्तसंस्था मात्र खरेदी करीत आहेत. काही आस्थापनांचे जाहीर झालेले निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने बाजारात नाराजी होती. त्यातच भूराजकीय संकट आणि सुरू असलेले व्यापार युद्ध यांनी इंधन ओतल्याने घसरण तीव्र झाली.

सोन्यामधील गुंतवणुकीवर १२.५ टक्के परतावा
सोन्यामधील गुंतवणूक ही गुंतवणुकदारांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र असते. सन २०१९मध्ये सोन्यामधील गुंतवणुकीवर १२.५ टक्के दराने परतावा मिळालेला असल्याने गुंतवणुकदार खूष आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या आयातीवर कर वाढविल्याने खुल्या बाजारातील सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र या वाढीमुळे बाजारातील सोन्याची मागणी घटलेली दिसून येत आहे.

Web Title: State of bears on the market with tremendous sales pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.