Lokmat Money > बिझनेस न्यूज > १२ आॅगस्टला राज्यस्तरीय उद्योजक संमेलन

१२ आॅगस्टला राज्यस्तरीय उद्योजक संमेलन

लघुउद्योग भारतीतर्फे देशातील सुक्ष्म व लघू उद्योजकांचे राज्यव्यापी संमेलन १२ आॅगस्ट रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊ र्जामंत्री पीयूष गोयल, तसेच अनेक केंद्रीय व राज्यांचे अधिकारी त्यास उपस्थित राहणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:34 AM2017-08-05T00:34:41+5:302017-08-05T00:34:48+5:30

लघुउद्योग भारतीतर्फे देशातील सुक्ष्म व लघू उद्योजकांचे राज्यव्यापी संमेलन १२ आॅगस्ट रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊ र्जामंत्री पीयूष गोयल, तसेच अनेक केंद्रीय व राज्यांचे अधिकारी त्यास उपस्थित राहणार आहेत.

State-level industrialists meeting on August 12 | १२ आॅगस्टला राज्यस्तरीय उद्योजक संमेलन

१२ आॅगस्टला राज्यस्तरीय उद्योजक संमेलन

मुंबई : लघुउद्योग भारतीतर्फे देशातील सुक्ष्म व लघू उद्योजकांचे राज्यव्यापी संमेलन १२ आॅगस्ट रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊ र्जामंत्री पीयूष गोयल, तसेच अनेक केंद्रीय व राज्यांचे अधिकारी त्यास उपस्थित राहणार आहेत.
उद्योगांच्या विविध पैलूंबाबत असलेले प्रश्न धोरण ठरविणाºया सरकारी यंत्रणेसमोर मांडणे, हा त्याचा हेतू आहे. संमेलनात कारखाना कायदे, कामगार कायदे, पायाभूत सुविधा, विविध अनुपालने आदी उद्योगविषयक विषयांवर चर्चा होईल. वीजपुरवठा, त्याचे दर आणि दर्जा याबरोबरच व्याजदर बँकांचा प्रतिसादासारख्या आर्थिक समस्यांचाही त्यात उहापोह होईल, असे लघुउद्योग भारतीचे कोकण विभागाचे सरचिटणीस भूषण मार्डे यांनी सांगितले.
लघु उद्योग भारतीचे देशातील ४६६ जिल्ह्यांत २५0 शाखा असून, सदस्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अनेक अर्थव्यवस्थांमध्ये लघू व मध्यम उद्योगांचे प्रमाण एकूण उद्योगांच्या सुमारे ९५ टक्के आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, औद्योगिक उत्पादनात व निर्यातीत मोठा हिस्सा हे लघू व मध्यम उद्योगांचे वैशिष्ट्य आहे.

Web Title: State-level industrialists meeting on August 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.