नवी दिल्ली : चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत शहरी भागांतील रोजगाराच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असून, नियमित वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे तसेच पुरुषांच्या तुलनेत महिला नोकरदारांची स्थिती अधिक चांगली झाली आहे.
लेबर फाेर्सने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार, एप्रिल-जून २०२४ या तिमाहीत शहरी भागातील नियमित वेतनधारकांची संख्या वाढून ४९ टक्के झाली आहे. हा मागील ४ तिमाहींचा उच्चांक आहे. जानेवारी-मार्चच्या तिमाहीत ही संख्या ४८.७ टक्के होती. वास्तविक महिलांतील बेरोजगारीचा दर ८.५ टक्क्यांवरून वाढून ९ टक्के झाला आहे. मात्र, या काळात वेतनधारक महिलांचे प्रमाण ५२.३ टक्क्यांवरून वाढून ५४ टक्के झाले आहे. पुरुषांचे प्रमाण ४७.५ टक्क्यांवरून घटून ४७.४ टक्के झाले.
वेतनधारी कमीच
एका विश्लेषणानुसार, नोकरदारांची संख्या अजूनही कोविड-१९ साथपूर्व काळाच्या पातळीवर आलेली नाही. कोविडच्या आधी वित्त वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत ५० टक्के लोक नियमित वेतनावर होते.
२०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत हे प्रमाण ४९% आहे. महिलांच्या बाबतीत स्थिती वाईट आहे. नियमित वेतनावरील महिलांचे प्रमाण २०२० च्या पहिल्या तिमाहीत ५८.३% होते. यंदा एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत हा आकडा ४ टक्के अधिक आहे.
सेवा क्षेत्रातील महिला २ वर्षांच्या उच्चांकावर : सेवा क्षेत्रातील महिलांची संख्या वाढून २ वर्षांच्या उच्चांकी गेली. सध्या ६४.२ टक्के महिला क्षेत्रात आहेत. एकूण नोकरदारांची हिस्सेदारी वित्त वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत उच्चांकावर राहिली.