Join us

पोलाद आयात वाढली

By admin | Published: February 09, 2016 2:01 AM

देशातील पोलाद आयात मागील महिन्यात जानेवारीत ८.७ टक्क्यांनी कमी झाली असली तरी चालू आर्थिक वर्षाचा विचार करता ही आयात २४ टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली : देशातील पोलाद आयात मागील महिन्यात जानेवारीत ८.७ टक्क्यांनी कमी झाली असली तरी चालू आर्थिक वर्षाचा विचार करता ही आयात २४ टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चीनसारख्या देशातून आयात कमी करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१६ मध्ये आयात जानेवारी २०१५ च्या तुलनेत ८.७ टक्क्यांनी घटली आहे. तथापि, तयार पोलादची आयात एप्रिल ते जानेवारी या काळात ९३ लाख टन आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वृद्धी २४ टक्के इतकी आहे. मंत्रालयातील समितीने एका अहवालात सांगितले आहे की, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भारत पोलाद आयात करणारा मोठा देश राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये घसरणीनंतरही भारताची पोलाद आयात २३ टक्के वाढली आहे. पोलाद आयात नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये २३ टक्के वाढली आहे. ही आयात ९.४ लाख टन एवढी आहे. नोव्हेंबरमध्ये ही आयात ७.६ लाख टन होती. आयसीसीने मागितले पॅकेज आयसीसी अर्थात इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सने पोलाद क्षेत्राला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली आहे. पोलाद क्षेत्र सध्या स्वस्त आयातीसह जागतिक व स्थानिक स्तरावर अनेक आव्हानांशी मुकाबला करत आहे. याबाबत आयसीसीने अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, पीएफसीच्या धर्तीवर पोलाद क्षेत्रासाठी एक आर्थिक संस्था असावी. ही आर्थिक संस्था पोलाद कंपन्यांचे बँक कर्ज आपल्या अखत्यारीत करेल. चिनी ड्रॅगनचा पोलादी विळखा डिसेंबर महिन्यात पोलाद आयात आदल्या वर्षीच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी घटली होती. जून महिन्यानंतर स्वस्त आयात रोखण्यासाठी सरकारने आयात सुरक्षा शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय इतरही आणखी काही उपाययोजना केल्या होत्या. चीनसारख्या निर्यातदार देशांतून भारतात मोठ्या प्रमाणात पोलादाची आयात होते. आयात प्रतिबंधक शुल्क वाढविल्यास हे देश आपल्या पोलादाची किंमत कमी करून समतोल कायम ठेवतात. त्यामुळे आयात कमी होत नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.