नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपनी असलेल्या स्टरलाइट टेकने चालू आर्थिक वर्षामध्ये ३०० ते ४०० तज्ज्ञ व्यक्तींची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद अग्रवाल यांनी ही माहिती देताना सांगितले की, कंपनी ५ जी नेटवर्क आणि वायरलेस तंत्रज्ञानावरील आपला कारभार जागतिक पातळीवर नेऊ इच्छित आहे. या विस्तार कार्यक्रमांतर्गत कंपनीला या क्षेत्रामधील ३०० ते ४०० व्यक्तींची जरूरी पडणार आहे. कंपनीने त्यासाठी तरुण आणि नव्यानेच पास होऊन बाहेर पडलेल्या व्यक्त्ींना नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.